GM NEWS, ग्रेट मराठी न्युज, अभिनंदनीय वृत्त : मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांची घेतली भेट .

0
133

नवी दिल्ली,दि.२२( ग्रेट मराठी वृत्तसेवा) :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी आज दि .२३येथील अर्थ मंत्रालयत राज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

राज्यातील पत्रकारांची सर्वात मोठी पत्रकार संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष सध्या दिल्ली येथे असून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, राष्ट्रीय मानवधिकार आयोगाचे सदस्य डॉ ज्ञानेश्वर मुळे व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्या सोबत सदिच्छा भेट घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली आहे.