GM NEWS, प्रेरणादाई वृत्त : चिपळूण येथील पूरग्रस्तांना भारतीय मराठा महासंघ औरंगाबादच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंची मदत सुपुर्द .

0
52

औरंगाबाद,दि. १४ (प्रतिनिधी ) : –
भारतीय मराठा महासंघ औरंगाबाद च्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संकलन केलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरग्रस्तांना करण्यात आले.
सदरील मदत गरजू कुटुंबांना शनिवारी, दिनांक 7 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष जाऊन देण्यात आली आहे. या कार्यात अनेक लोकांनी जीवनावश्यक वस्तु दिलेल्या आहेत.
गहू, ज्वारी, बाजरी ,तांदूळ, डाळी ,तेल,तिखट ,मीठ ,दंतमंज, साबण, बिस्किट यासारख्या वस्तू दिलेल्या आहेत . दोनशे गरजू कुटुंबांना ही मदत देण्यात येणार आहे.
सदरील वस्तू भारतीय मराठा महासंघाचे औरंगाबादचे पदाधिकारी स्वतः जाऊन गरजू कुटुंबांना स्वहस्ते देणार आहेत.
या कार्यात भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ थोरात ,महिला शहराध्यक्ष कांता ताई कदम, औरंगाबाद जिल्हा संघटक रामदास मनगटे, औरंगाबाद महिला शहर उपाध्यक्ष उज्वलाताई गाढवे , महिला शहर संघटक भीमा ताई बोचरे ,महिला शहर सचिव दिपाली पाटील, महिला शहर कार्याध्यक्ष विजया पवार , औरंगाबाद तालुका अध्यक्ष( पूर्व )अनिल तांगडे , तसेच शिवाजीराव जाधव सर , फंड सर, वाकडे सर इत्यादींनी मेहनत घेऊन सदरील जीवनावश्यक वस्तूंचे संकलन केले आहे.
या कार्यासाठी भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्री आप्पासाहेब आहेर,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बन्सी ( दादा) डोके, मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक दत्ता साहेब सिनगारे तसेच मुंबई प्रदेशाध्यक्ष मेघा ताई पानसरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.