GM NEWS, ग्रेट मराठी न्युज,अपघात वृत्त : अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू . पहूर जवळील दुर्घटना

0
526

पहूर , ता .जामनेर दि . ९( प्रतिनिधी ) : –
पहूर कडून औरंगाबाद कडे जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची दुर्घटना आज पहाटे घडली .
याबाबत अधिक माहिती अशी की , आरिफ तडवी ( २६ वर्षे ) राहणार कोल्हे , ता . पाचोरा हा तरूण पहूर येथील सासरवाडीहून औरंगाबादकडे कामानिमित्ताने टीव्हीएस स्पोर्ट दुचाकीने जात होता . दरम्यान जळगाव औरंगाबाद महामार्गावर हिवरी फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला . याप्रकरणी पहूर पोलिस आत गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानसिंग राजपूत करीत आहेत .