GM NEWS,ग्रेट मराठी न्युज, आवाहन वृत्त : कायद्याने वागाल तर फायद्यात राहाल ! – पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांचे प्रतिपादन . पहूर पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न . कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्यक्रम देत माणुसकीचं नातं निर्माण करण्याची दिली ग्वाही .

0
377

पहूर , ता. जामनेर दि . ९( शंकर भामेरे ) : -कायद्याने वागाल तर फायद्यात राहाल, कायदा हा सर्वांसाठी समान असून आपण कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्राधान्यक्रमाने प्रयत्न करणार आहोत , असे प्रतिपादन नव्याने नियुक्त झालेले पहूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून केले .
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली .या बैठकीत आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले . गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव या वेळी उपस्थित होते . पोलीस निरीक्षक धनवडे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की , मला ओळख न सांगता काम सांगावे , आपले काम कायद्याच्या चौकटीत राहून तडीस नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल .कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे माझे पहिले लक्ष्य असून प्राधान्यक्रमाने अवैध धंद्यांचा प्रश्न , माता-भगिनींवरील अन्याय अत्याचार दूर करणे ,व्यसनाधीन तरुणाईला निर्व्यसनी बनविणे यासह इतरही बाबींवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे ते म्हणाले .
पोलिस प्रशासनाला गावकऱ्यांनी सहकार्य करण्याची अपेक्षाही त्यांनी बोलताना व्यक्त केली . सूत्रसंचालन व आभार माजी पोलीस पाटील विश्‍वनाथ वानखेडे यांनी मानले .