GM NEWS , ग्रेट मराठी न्यूज : आवाहन वृत्त : प्रत्यक्ष मंडपात येऊन श्री दर्शन न घेता ऑनलाइन किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने घरूनच घ्यावे ‘श्रीं’चे दर्शन ! जळगांव जिल्हा प्रशासनाचे भाविकांना आवाहन . गणेश उत्सव मंडळांनी भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश .

0
76

जामनेर दि . ९ ( मिलींद लोखंडे ) :कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर गणपती उत्सव सुरू होत असून भाविकांनी गणपती दर्शनासाठी प्रत्यक्ष मंडपात न जाता ऑनलाईन पद्धतीने दर्शन घ्यावे तसेच मंडळांनी सुद्धा ऑनलाईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने भाविकांना श्री दर्शनाचा लाभ मिळवून द्यावा , असे आवाहन प्रशासनाने केले आहे .
विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन शुक्रवार दिनांक 10 सप्टेंबर पासून होत आहे .यावर्षी सुद्धा गणेशोत्सवावर कोराणाचे सावट कायम आहे . गणपती उत्सव साजरा करताना प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अटींची पूर्तता मंडळांनी करावी .सोशल डिस्टंसिंग सह मास्कचा वापर करण्यात यावा .असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून कोरोना विषाणू संक्रमणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्यक्ष मंडपात न जाता भाविकांनी श्रीमुख दर्शनाचा लाभ ऑनलाइन पद्धतीने तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने घ्यावा .भाविकांना ऑनलाईन दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंडळाच्या आयोजकांनी तशी सुविधा उपलब्ध करून द्यावी .प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत . भाविकांनी कोरोना निर्मूलन आणि नियंत्रणासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .