GM NEWS , ग्रेट मराठी न्यूज, धक्कादायक गुन्हे वार्ता: जामनेर तालुक्यतील नाचणखेडा गावातील एकाच कुटुंबातील फुस लाऊन पळवून नेलेल्या ‘त्या’ तिन्ही अल्पवयीन मुली सुखरूप. मुलींना शोधण्यात पहूर पोलीसांची उल्लेखनीय कामगीरी . पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रृ . मुलींची बाल कल्याण समितीकडे रवानगी .

0
1121

पहूर , ता . जामनेर दि . १० ( शंकर भामेरे ) : – नाचणखेडा ( ता . जामनेर ) येथील एकाच कुटुंबातील फुस लाऊन पळवून नेलेल्या तीन अल्पवयीन मुली अहमदनगर जिल्ह्यातील केळगाव चौफुला येथे आढळून आल्या असून त्यांची रवानगी बाल कल्याण समिती , जळगाव यांच्या कार्यालयाकडे करण्यात आली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , पहूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नाचणखेडा येथील एकाच कुटुंबातील १५ वर्षांच्या २मुलींसह १६ वर्षांची १ मुलगी अशा तिन्ही अल्पवयीन मुली दि . ९ सप्टेंबर रोजी अज्ञात व्यक्तींनी फुस लाऊन सोबत पळवून नेल्या होत्या . विशेष म्हणजे त्यातील दोन मुली सख्ख्या बहिणी असून १ चुलत बहीण आहे . घटना उघडकीस येतात मुलींच्या वडिलांसह नातेवाइकांनी पहूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली होती . त्यानुसार भा .द .वि .३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता .पोलीस निरीक्षक अरून धनवडे यांनी मुलींच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेत पुढील तपासाची दिशा ठरविली . तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथक तयार करण्यात आली . मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नातेवाईकांच्या सहकार्याने ता . १० रोजी रात्री उशिरा सदर तिघही मुली अहमदनगर जिल्ह्यातील केळगाव चौफुला येथे आढळून आल्या . सदर मुलींना विश्वासात घेत त्यांना आज सकाळी पहूर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले . तिघंही मुली अल्पवयीन असल्याने त्यांना बाल कल्याण समिती जळगाव यांच्या कार्यालयात रवाना करण्यात आले . मुलींना पाहून पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळले .त्यांनी पोलिसांचे आभार मानले .

ओळखीतून झाले पलायन

गावातीलच ओळखीच्या तीन अल्पवयीन मजुरांनी सदर मुलींना फूस लावून पळवून नेल्याची प्राथमिक माहिती हाती आली असल्याचे सुत्रांनी सांगितले .
तिन्ही मुली सुखरूप परतल्या बद्दल पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे . या मुलींचे समुपदेशन होणे गरजेचे असल्याने पालकांच्या स्वाधीन न करता त्यांची बाल कल्याण समितीकडे रवानगी करण्यात आली आहे .दरम्यान पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच मुलींना पळवून नेणाऱ्यांनी पळ काढल्याने ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत . तथापि महिला बालकल्याण समितीच्या शिफारशीनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे .

सुसंवाद गरजेचा

पालकांनी आपल्या मुला-मुलींसोबत खुला संवाद साधणे गरजेचे झाले आहे .आज तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल , टीव्ही मुळे मुला-मुलींमध्ये वाढत्या वयाबरोबर होणारे शारीरिक मानसिक बदल समजावून सांगणे गरजेचे आहे .मुला-मुलींना धीर देण्याची गरज आहे .

अरुण धनवडे ,
पोलीस निरीक्षक ,पहूर