GM NEWS , ग्रेट मराठी न्यूज ,प्रेरणादायी धार्मिक वृत्त : वाकोद येथील सौ .आरती अर्पण लोढा यांची ११ दिवसांच्या उपवासाची तपोसाधना . उद्या मंगळवारी संत मुनींच्या सान्निध्यात जामनेर येथे उपवासाची पंचकावनी होणार संपन्न . आजच्या चंगळवादी जगात तरुणाई पुढे निर्माण केला आदर्श .

0
478

वाकोद / पहुर,ता . जामनेर , दि . १३ ( शंकर भामेरे) वाकोद येथील प्रतिष्ठीत व्यापारी सुभाषचंद उत्तमचंद लोढा यांच्या सुनबाई आणि पत्रकार अर्पण लोढा यांच्या पत्नी सौ. आरती अर्पण लोढा यांनी वयाच्या ३३ व्या वर्षी जैन समाजातील महत्त्वपूर्ण असलेली निरंकार तप तपश्या करीत ११ उपवासाची पचकावनी उद्या मंगळवार रोजी सकाळी १० वाजता नवीन महावीर भवन गणेश नगर , जामनेर येथे उपस्थित संताच्या सानिध्यात होणार असून बुधवार रोजी ११ उपवास पूर्ण होणार आहे. या उपवास काळात निरंकार पूर्णतः अन्न त्याग करून ही तपश्यर्या केली जाते जैन समाजात या तपश्येला फार महत्त्व आहे जामनेर येथील जैन चातुर्मासा निमित्त लाभले जैन संताच्या सानिध्यात आरती लोढा यांनी आपले कठीण व कठोर अशी तप साधना पार पाडली.

काय असतो जैन उपवास ?

– जैन उपवास हा एक वेगळा प्रकारचा उपवास असतो .यात पूर्णतः अन्न त्याग केला जातो . या उपवासात फक्त उकळून घेतलेले पाणी पिण्याची मुभा असते .तेही सूर्यास्त पूर्वी .या उपवासात कोणत्याही प्रकारचे अन्न किंवा फळ, फ्रूट, फंळाचा ज्यूस देखील खाने पिण्याचे पूर्ण पणे त्याग केला जातो . यात उकळून थंड पाणी पिण्याची मुभा असल्याने तेही सूर्योदया पासून ते सूर्यास्ता पर्यंत असल्याने त्याला जैन धर्मात तिविहार( फक्त पाणी पिण्या शिवाय कोणतेही अन्न पदार्थ न खाता केलेले तप) उपवास असे म्हणतात.
उपवासाच्या पहिल्या रात्री पासुनच जेवणाचा पूर्ण पणे त्याग सुरु ठेवून जो पुढच्या पूर्ण दिवसभर आणि रात्र भर सुरू असतो. हे व्रत अतिशय कठीन आणि कठोर असल्याने याला फार महत्व असते. यांनी केलेल्या तपाचे सर्वत्र कौतुक होत आहे.