GM NEWS,ग्रेट मराठी न्युज, अभिनंदनीय वृत्त : जितेंद्र गोरे यांची किसान युवा क्रांती संघटनेच्या जामनेर तालुका प्रमुख पदी निवड !

0
226

जामनेर,दि.14 ( मिलींद लोखंडे ) : -शेतकरी बांधवांना त्यांचा न्याय हक्क मिळवुन देण्यासाठी स्थापन करण्या आलेल्या किसान युवा क्रांती या संघटनेच्या जामनेर तालुका प्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र रामकृष्ण गोरे(गोरे सरकार ) यांची निवड करण्यात आली आहे .
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी जितेंद्र गोरे यांचे सामाजिक कार्य बघुन नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले आहे . संघटनेच्या माध्यमातुन शेतकरी कष्टकरी बांधवांच्या समस्या सोडवुन जामनेर तालुक्यात शेतकरी चळवळ गतीमान करावी अशा शुभेच्छासह संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी नवनियुक्त तालुका प्रमुख जितेंद्र गोरे यांचे अभिनंदन केले आहे.
जितेंद्र गोरे यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .