GM NEWS , ग्रेट मराठी न्यूज ,साहित्यिक वृत्त : पहूर येथील साहित्यिक रविंद्र पांढरे यांचा पहूरपेठ गृप ग्रामपंचायतीने केला नागरी सत्कार . ‘सायड’ कादंबरीचे साहित्य विश्वात होतेय जोरदार स्वागत .

0
200

पहूर ,ता .जामनेर दि . १४ ( शंकर भामेरे) पहूर पेठ येथील साहित्यिक रविंद्र पांढरे यांची ‘सायड ‘ही कादंबरी पुणे येथील रोहन प्रकाशनाने प्रकाशित केल्या बद्दल त्यांचा पहूर पेठ ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला .
‘प्रत्येक बहराच्या नशीबी पाणगळ ही लिहीलेली असते ‘ या सत्याचा पुन:प्रत्यय देणार्या या कादंबरीत शेती शिवाराच्या सानिध्यात उत्स्फूर्तपणे फुलून आलेल्या प्रगल्भ सहजीवनातील अनेक पदरी व्यामिश्र अनुभव अविष्कृत झाले आहे.
याआधी रविंद्र पांढरे यांच्या ‘अवघाचि संसार ‘ व ‘पोटमारा ‘या कादंबर्या मान्यवर प्रकाशकांनी प्रकाशित केल्या आहेत. ‘अवघाचि संसार ‘या कादंबरीवर आधारित ‘घुसमट ‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर ‘पोटमारा ‘ या कादंबरीचा उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या एम. ए.च्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. ‘मातितली माणसं ‘ या त्यांच्या कथासंग्राहास शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
कादंबरी ‘सायडच्या ‘ प्रकाशनाच्या निमित्ताने मान्यवरांनी ‘सायड’ चे स्वागत आणि रविंद्र पांढरे यांचे अभिनंदन केले आहे.

पहूर पेठ ग्रामपंचायतने केला नागरी सत्कार .

ग्रामीण साहित्यिक रवींद्र पांढरे यांनी पहूर गावाचा लौकिक वाढविला आहे .पहूर पेठ ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा नुकताच शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठ पत्रकार शांताराम बापू लाठे यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आला . यावेळी आजी-माजी शिक्षक ,पदाधिकारी , पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .