GM NEWS , Big Breaking : लोहारा येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात काशिनाथ यशवंत राजपूत यांचा मृत्यू.मधमाश्यांच्या हल्यात मामा दगावला तर भाचा बचावला .

0
1080

*लोहार गावासह परिसरात हळहळ.*
लोहारा, ता.पाचोरा/ दि .१ (ज्ञानेश्वर राजपूत )
– पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील काशिनाथ यशवंत राजपूत ( वय -६०) व त्यांचा भाचा गोपाल रघुनाथ राजपूत ( वय २५ ) हे आज दि. १ नोव्हेंबर रोजी शेतात पाहणी करण्यासाठी जात असतांना सकाळी ११:०० वाजेच्या दरम्यान आग्या मधमाश्यानी पाठीमागून अचानक हल्ला करून चावा घेण्यास सुरुवात केली भांबावलेल्या अवस्थेत यावेळी समयसुचकता बाळगुन गोपाल रघुनाथ राजपूत हे आडोशाला कपाशी पिकात झोपून लपले त्यामुळे ते बचावले तर काशिनाथ यशवंत राजपूत हे आग्या मधमाश्यांच्या हल्यात गंभीर जखमी झाले.त्यांना अधिक उपचारासाठी मामा काशिनाथ राजपूत(मयत) यांना पाचोरा येथील रुग्णालयात आणत असतांनाच रस्त्यात त्यांचा मुत्यु झाला.पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मुत्यु झाला असल्याचे सांगितले.यावेळी लोहारा येथील पञकार ज्ञानेश्वर राजपूत,माजी जिल्हा परिषद सदस्य दिपकसिंग राजपूत,माजी सरपंच अक्षयकुमार जैसवाल.ईश्वर देशमुख,कडुबा देशमुख,दिनकर गिते,नथ्थु अहिरे,बाळु गुजर,ईश्वर खरे आदी मदतीला धावून आले.मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. सायंकाळी शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले मयताच्या पश्चात दोन भाऊ पुतणे असा परिवार आहे.