GM NEWS , ग्रेट मराठी न्यूज : HELPING HANDS :आवाहन वृत्त : जामनेर शहरातील दोन्ही किडन्या निकामी झालेल्या तरुणाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन . पीडित गौरव वाचविण्यासाठी “एक हात मदतीचा … ‘ पुढे करण्याची गरज . मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या खाटीक कुटुंबाची मुलाला वाचविण्यासाठी धडपड .

0
344

जामनेर, दि . १५ ( मिलिंद लोखंडे ) : जामनेर शहरात जामनेर पुरा भागातील रहिवासी १७ वर्षीय तरुणाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्याच्या उपचारासाठी मदतीची गरज असून दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन GM NEWS HELPING HANDS तर्फे करण्यात आले आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , जामनेर शहरात जामनेर पुरा भागामध्ये रहिवासी असलेले नंदू खाटीक (घन )यांचा मुलगा गौरव नंदू खाटीक वय 17 वर्षे याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून तो किडनीच्या आजाराने त्रस्त आहे .या मुलाची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असून हा मुलगा कुटुंबाचा आधार आहे . सदर मुलाचे पालक मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवितात . त्यास वाचवण्यासाठी व त्याच्या ऑपरेशन साठी लाखो रुपयांचा खर्च येणार आहे .सदर खर्च हे कुटुंब पेलू शकत नसून अनेक दिवसांपासून त्यास या आजाराने ग्रासले आहे .
पीडित नंदूला वाचविण्यासाठी मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे . समाजातील दानशूर व्यक्तींनी यथाशक्ती मदत करून या गरजू मुलाला जीवन दान द्यावे ,आपण केलेली एक रुपयाची मदत सुद्धा या मुलाचे प्राण वाचू शकते. तरी आपण खारीचा वाटा उचलून नंदूला शक्य ती मदत करून खारीचा वाटा उचलावा .जीएम न्यूज हेल्पिंग हॅण्डस् तर्फे सर्व संवेदनशील दानशुर समाजघटकांना सामाजिक राजकीय संघटना संस्थांना विनम्र आवाहन .

अधिक माहीतीसाठी आणि मदतीसाठी आपण सामाजिक कार्यकर्ते सचिन बोरसे मो .नं – 8459175519 अथवा भाऊ दिपक घन ( खाटीक ) 9579962857 यांच्याशी संपर्क साधावा.