GM NEWS, ग्रेट मराठी न्युज, आवाहन वृत्त: जामनेर नगरपरिषदेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी गणेश मुर्ती आणि निर्माल्य संकलन केंद्राची व्यवस्था . गणेशभक्तांनी गणेशमुर्ती आणि निर्माल्य विसर्जनासाठी शहरातील संकलन केंद्रांचा लाभ घेण्याचे आवाहन !

0
234

जामनेर , दि .१५ ( मिलींद लोखंडे ) :- जामनेर शहरातील सार्वजनिक गणपती व घरगुती गणपती विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा २.० अभियानांतर्गत स्वच्छता राखण्यासाठी जामनेर नगर परिषदे प्रशासनाच्या वतीने शहरात ०३ ठिकाणी गणपती मुर्ती संकलन व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जामनेर नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्बंधामुळे विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी नागरीकांच्या सोयीसाठी १७ सप्टेंबर २०२१ व १९ सप्टेंबर २०२१ रोजी जामनेर नगरपरिषदेतर्फे शहरात ०३ ठिकाणी गणपती मूर्ती संकलन व निर्माल्य संकलनासाठी नगरपालिका चौक, जामनेर नगरपरिषद आरोग्य गोडाऊन चौक-भुसावळ रोड व भुसावळ नाका शास्त्रीनगर येथे व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा २.० अभियानांतर्गत जामनेर नगरपरिषदेच्या वतीने ही व्यवस्था करण्यात आली आहे. तरी नागरीकांना दिलेल्या ठिकाणी गणपती संकलन आणि निर्माल्य संकलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जामनेर नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.