ग्रेट मराठी न्युज(GM NEWS), अभिनंदनीय वृत्त : राज्यस्तरीय ॲथेलेटिक्स स्पर्धेत हरिभाऊ राऊत यांना कांस्य पदक पहूरच्या शिरपेचात मानाचा तुरा !

0
60

पहूर , ता . जामनेर दि.२६ ( शंकर भामेरे ), येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी चे सचिव हरीभाऊ राऊत यांनी अमरावती येथे आयोजित द्वितीय राज्यस्तरीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत १५०० मिटर्स ॲथेलेटिक्स स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली .
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, महाराष्ट्र खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन व अमरावती जिल्हा खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने दि. २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान आयोजित द्वितीय महाराष्ट्र राज्य खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक हरिभाऊ राऊत यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला . १५oo मिटर्स धावणे , ॲथलेटिक क्रीडा प्रकारात त्यांनी कांस्यपदक पटकावले .
अमरावती स्पर्धेचे उदघाटन खासदार नवनीत राणा यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून केले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, आमदार बळवंत वानखेडे, माजी महापौर विलास इंगोले यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या अंजली ठाकरे यांनी तर सूत्रसंचालन शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ नितीन चवाळे यांनी केले.
विजेते हरीभाऊ राऊत यांना मान्यवरांच्या हस्ते कांस्य पदक आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले . विद्यार्थ्यांना तायक्वांदो , कराटे , ॲथलेटिक स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर विविध पदकांची कमाई करण्यासाठी मार्गदर्शन करणारे हरिभाऊ राऊत यांनी स्वतः सहभागी होऊन कांस्य पदक पटकावले .
त्यांच्या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव अण्णा घोंगडे , उपाध्यक्ष शांताराम दादा पाटील , सचिव भगवान आण्णा घोंगडे , सन्माननिय सर्व संचालक मंडळ सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती व्ही . व्ही . घोंगडे सर्व सन्माननीय शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी अभिनंदन केले .अनिल पवार यांचे सहकार्य लाभले .