ग्रेट मराठी न्युज (GM NEWS) , अभिनंदनीय वृत्त: जामनेर तालुक्यातील क्रीडा विश्वाच्या शिरपेचात मानाचे मोरपंख ! राज्यस्तरीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत प्रा.समीर घोडेस्वार यांची कांस्यपदकाची हॅट्रिक.

0
52

जामनेर,२६ ( मिलींद लोखंडे ) : –
महाराष्ट्र खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन व अमरावती जिल्हा खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने दि.२४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या २ री महाराष्ट्र राज्य खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेस अमरावती येथे जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन सदस्य तथा जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार यांनी ४०+ पुरुष गटात:- भालाफेक- तृतीय क्रमांक, तिहेरी उडी – तृतीय क्रमांक, गोळा फेक – तृतीय क्रमांक यात कांस्यपदकाची हॅट्रिक करत मेरिट प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी खासदार सौ.नवनीत राणा, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.हर्षवर्धनजी देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.दिलीपबाबूजी इंगोले, आमदार बळवंत वानखेडे, मा.महापौर विलास इंगोले, महाराष्ट्र खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशनचे सचिव अमन चौधरी, पदाधिकारी सुनिल हामंद, गुरुपालसिंग सेठी, राजेश जाधव, प्रशांत कोल्हे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी.मान्य.वराची उपस्थिती होती.
त्यांच्या यशाबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन,मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपमुख्याध्यापक एस एन चवरे, उपप्राचार्य प्रा.के एन मराठे, पर्यवेक्षक प्रा.के.डी निमगडे यांनी अभिनंदन केले.