ट्रुजेट कंपनीच्या हलगर्जीपणामुळे जळगाव विमानसेवेच्या आनंदावर विरजण, फ्लाईटला उशिर व रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठे नुकसान.

0
118

जळगाव दि .०६ (प्रतिनिधी ) : -जळगाव येथे विमानसेवा सुरू झाल्याचा आनंद प्रवाशांना झाला असला तरी,ट्रुजेट ” कंपनी योग्य सेवा देत नसल्याने ग्राहकांच्या या आनंदावर विरजण पडले आहे. “ट्रुजेट” कंपनी ग्राहकांच्या सेवेत कमी पडत असून,कस्टमर केअरच्या गलथाणपणाने ग्राहकांचे मोठे नुकसान होते आहे. फ्लाईट उशिरा असल्याची ग्राहकांना कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना न देण्याचा सावळा गोंधळ “ट्रुजेट” कंपनीद्वारा होतो आहे.केवळ अगदी वेळेवर एक मँसेज टाकून ” ट्रुजेट” फ्लाईट कंपनीची जबाबदारी संपली असे होत नाही .
सरस्वती डेअरी व सरस्वती फोर्डचे संचालक धवल टेकवाणी,त्यांच्या सौभाग्यवती पूजा टेकवाणी, २ वर्षाचा चिमुकला अयांश टेकवाणी,यांची जळगाव ते मुंबईची “ट्रुजेट “कंपनीची फ्लाईट आज ६ नोव्हेंबर सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी होती ती फ्लाईट उशिरा १२ वाजून २५ मिनीटांनी करण्यात आली टेकवाणी हे आपल्या परिवारासह ११ वाजून ४० मिनिटांनी एअर पोर्टवर हजर असून सुध्दा त्यांना आतमध्ये जाऊ देण्यात आले नाही .कंपनीच्या या हलगर्जीपणामुळे टेकवाणी यांना मुंबई येथे अत्यंत महत्त्वपूर्ण मिटींगला जाणे शक्य झाले नाही .
फ्लाईट पावणे दोन तास उशिरा असताना ग्राहकांनी वेळेचे नियोजन कसे करायचे? यावेळी झालेल्या मानसिक ञासाबद्दल जबाबदार कोण ? असा प्रश्न टेकवाणींसह ग्राहकांनी केला आहे.फ्लाईट उशिरा असल्याची ग्राहकांना वेळेवर सुचना दिल्याने प्रवासाची पर्यायी व्यवस्था करणे सुद्धा प्रवाशांना शक्य होत नाही .त्यामुळे ” ट्रुजेट” कंपनीवर विश्वास कसा ठेवायचा? असा कोणता कायदा आहे.याचे उत्तर कंपनीने द्यावे अन्यथा ग्राहकमंचात तक्रार करण्याचा इशारा धवल टेकवाणी यांनी दिला आहे.
यापूर्वी सुध्दा ४ नोव्हेंबरला अचानक अहमदाबाद फ्लाईट रद्द झाल्याने,अनेक प्रवाशांचे संपूर्ण नियोजन विस्कटून मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने प्रवाशांमध्ये मोठी नाराजी पसरलेली आहे. हे असेच होत राहिले तर यापुढे या कंपनीवर विश्वास कोण ठेवणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.