ग्रेट मराठी न्युज(GM NEWS), दिन विशेष वृत्त : – क्रांतीसुर्य फाउंडेशन तर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा ; विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद.

0
60

पहूर,जामनेर,दि२८ (शंकर भामेरे) : – क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पहूर येथील क्रांतीसुर्य फाउंडेशनतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला .

     महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले .

       यावेळी क्रांतीसुर्य फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला . क्रांतीसुर्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक जाधव यांनी प्रास्ताविक केले . क्रीडा शिक्षक हरिभाऊ राऊत यांनी मनोगत व्यक्त केले . शाळेतील सर्व शिक्षक – शिक्षीका शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले . यशस्वीतेसाठी गजानन सोनवणे , भागवत सोनवणे , अनिल घोंगडे , सुनिल पांडव , ज्ञानेश्वर चौथे यांचे सहकार्य लाभले .सुत्रसंचालन स्पर्धा समन्वयक शंकर भामेरे यांनी केले .

       प्रथम , द्वितीय , तृतीय , उत्तेजनार्थ विजेत्यांना ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी स्मृती चिन्ह , प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे .