ग्रेट मराठी न्युज(GM NEWS),उद्घाटन वृत्त: महामार्ग पोलीस केंद्रातर्फे पाळधीत नविन पोलीस चौकीचे उद्या ३० नोव्हेंबर रोजी उद्घाटन.

0
57

जळगाव,दि.२९ नोव्हेंबर ( मिलींद लोखंडे) – येथील महामार्ग पोलीस केंद्रातर्फे पाळधी येथे नवीन महामार्ग पोलीस चौकीचे उद्घाटन तसेच मृत्युंजय‌ दूत गुणगौरव सोहळा ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या हस्ते या महामार्ग पोलीस चौकीचे उद्घाटन होणार असून अपघात झाल्यावर सहकार्य करणाऱ्या मृत्युंजय दूतांचा सत्कारही यावेळी डॉ.सिंघल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहीकर, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, उद्योगपती श्रीकांत मणियार हे उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी. असे आवाहन पोलीस उअधीक्षक प्रदीप मैराळे (नाशिक), पोलीस निरीक्षक हेमंत भामरे (धुळे), प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल शेजवळ यांनी केले आहे.