ग्रेट मराठी न्यूज ,गुन्हे वार्ता : जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील कपाशी व्यापाऱ्याचे ७ लाख लुटणारे गुंड स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात . मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेले शस्त्र पोलीसांनी शिताफीने केले जप्त . सोनाळ्यातूनच गवसले तपासाचे धागे ; अवघ्या २४ तासात गुन्ह्याचा पर्दाफाश . ‘सदरक्षणाय् खलनिग्रहणाय्’ पोलीस ब्रीद वाक्याचा आला प्रत्यक्ष प्रत्यय ! य्

0
342

पहूर , ता . जामनेर , दि . २६( ग्रेट मराठी न्यूज वृत्तसेवा) : – जामनेर तालुक्यातील सोनाळा -पहूर मार्गावर कपाशी व्यापार्‍याला चाकू व गावठी कट्ट्याचा धाक दाखवून त्यांच्या जवळील ७ लाख रुपये लुटणाऱ्या चार गुंडांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशात मुसक्या आवळल्या .
या बाबत अधिक माहिती अशी की , सोनाळा येथील कपाशी व्यापारी संजय रामकृष्ण पाटील हे मोटर सायकल वरून सोनाळा येथून पहूर कडे नेहमीप्रमाणे येत असता बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या चौघांनी त्यांचा पाठलाग करून गावठी कट्टा व चाकूचा धाक दाखवून त्यांच्या थैलीतील सुमारे ७ लाख रुपये लुटून पोबारा केला होता .
या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . गुन्ह्याच्या तपास कामी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन वेगाने तपासाची चक्रे फिरविली .जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्या पथकाने शिताफीने प्रयत्न करून आरोपींना मुद्देमालासह अटक केली .
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन अज्ञात आरोपींचा शोध घेतला असता मिळालेल्या माहितीवरून संशयित इसम गोपाल हरी पाटील राहणार सोनाळा ( ता. जामनेर ) यास ताब्यात घेऊन त्या गुन्ह्यात विचारपूस केली असता त्याने साथीदार प्रविण रमेश कोळी ( २६ वर्षे ) राहणार वाल्मिक नगर जळगाव , गोपाल श्रावण तेली ( वय ३९ वर्षे ) राहणार कळमसरा , ता .पाचोरा , प्रमोद कैलास चौधरी (वय २७ ) राहणार कळमसरा ता . पाचोरा ,लाखन दारासिंग पाशी ( वय ३४) आसोदा रोड जळगाव यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली . गुन्ह्यात लुटलेले रोख रुपये हे आम्ही आपापसात वाटून घेतले अशी माहिती दिल्याने वेळीच तपास पथक आरोपीने दिलेल्या त्यांचे साथीदारांची शोध कामी रवाना होऊन त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले . असून गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी गोपाल हरी पाटील सोनाळा प्रविण रमेश कोळी वाल्मिक नगर जळगाव गोपाल श्रावण तेली कळमसरा आणि प्रमोद कैलास चौधरी कळमसरा तालुका पाचोरा लाखन दारासिंग पासी जुना आसोदा रोड जळगाव यांच्याकडून त्यांनी जबरी चोरी केलेले रोख 4 लाख 74 हजार चारशे साठ रुपये हस्तगत करून आरोपी ताने गुन्हा करताना गुन्ह्यात वापरलेले हत्यार गावठी कट्टा व गुन्ह्यात वापरलेले साधन 22 हजार पाचशे रुपये किमतीचे पाच मोबाईल सेल फोन 80 हजार रुपये किमतीचे व दोन मोटर सायकल सह एकूण पाच लाख 96 हजार 960 रुपये किमतीचा मालक हस्तगत करण्यात आला .या पथकात स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले , सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पडे , पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे यांच्यासह पोलिस कर्मचारी अधिकारी यांचा सहभाग होता .
पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे .