GM NEWS,FLASH: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील 18 नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर .

0
80

जळगाव, दि. 16 ( प्रतिनिधी ) :- आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे दिनांक 18 नोव्हेंबर, 2019 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
श्री.पाटील हे सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील.
तरी सर्व संबंधित यंत्रणांनी याची नोंद घेऊन बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.