ग्रेट मराठी न्युज(G M News), अभिनंदनीय वृत्त: जामनेर शहरातील इंदिराबाई ललवाणी विद्यालयाची नेहा देशमुख व अश्विनी पवार यांची राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड !

0
51

जामनेर,दि.३ ( मिलींद लोखंडे) :महाराष्ट्र राज्य ॲथलेटीक्स असोसिएशन तर्फे बुलढाणा येथे दि.१७ डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशन तर्फे जळगाव जिल्हा संघ निवडचाचणी अजिंक्यपद स्पर्धा मोहाडी फाटा, मेहरुन तलाव परिसर जळगाव येथे नुकत्याच संपन्न झाल्या यात इंदिराबाई ललवाणी विद्यालयाची खेळाडू:-

*▪️१८ वयोगट मुली : २ की.मी.:* नेहा सुनील देशमुख (इ.११ वी )

*▪️२० वयोगट मुली : ६ की.मी. :* अश्विनी विजय पवार (इ.११ वी )यांची राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघात निवड झाली याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन संचालक तथा जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स सचिव राजेश जाधव,क्रीडा शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, प्रा.इकबाल मिर्झा, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे तांत्रिक समिती प्रमुख जी सी पाटील, प्रा.समीर घोडेस्वार आदी. मान्यवर उपस्थित होते राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

      या निवडीबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ महाजन, सचिव किशोर भाऊ महाजन, मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपप्राचार्य प्रा.के एन मराठे, पर्यवेक्षक प्रा.के डी निमगडे,ज्येष्ठ शिक्षक प्रा.जी जी अत्तरदे यांनी अभिनंदन केले तसेच सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभले.