ग्रेट मराठी न्युज, गुन्हे वार्ता : नेरी येथील चाकु हल्ला प्रकरणी आरोपीस एक वर्षाच्या सक्त मजुरीसह पाच हजाराच्या दंडाची शिक्षा.

0
769

जामनेर,दि.१२ ( मिलींद लोखंडे ) : –
नेरी येथील आठवडे बाजारात दि.१४ नोव्हेंबर २०१७ रोजी आरोपी विजय अनिल रोकडे याने दारुच्या नशेत फीर्यादी प्रशांत राजु अपार यांच्यावर चाकु हल्ला केला होता. झालेल्या हल्ल्यात फीर्यादी गंभीर जखमी झाले होते. सदर गुन्ह्याचा खटला जामनेर न्यायालयात सुरु होता काल दि.१२ रोजी न्यायाधिश डी.एन.चमाले यांनी आरोपीस एक वर्षाची सक्त मजुरी सह पाच हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
                                    या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, आरोपी विजय अनिल रोकडे याने दारुच्या नशेत तर्र होऊन फीर्यादी प्रशांत राजु अपार यांच्याशी नेरी येथील आठवडे बाजारात भांडण करून शिविगाळ करत त्यांच्या पार्श्वभागावर धारदार चाकुने वार करून गंभीर दुखापत केली होती. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांना आणी घटनेच्या साक्षीदारांना सुद्धा जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता .जामनेर न्यायालयात काल दि. १२ रोजी खटल्याचा महत्वपुर्ण निकाल न्यायाधिश डी.एन.चामले यांनी सुनावला त्यांनी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरीसह पाच हजार रुपये दडांची शिक्षा ठोठावली .या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अनिल सारस्वत यांनी काम पाहिले तर पोलीस कॉन्सटेबल निलेश सोनार यांनी सहकार्य केले.