ग्रेट मराठी न्युज,राजकीय वृत्त: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व्ही.जे.एन.टी सेल महारष्ट्र प्रदेशाध्यक्ष मदनभाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारणीची बैठक संपन्न !

0
857

मुंबई, दि.१ ( मिलींद लोखंडे ) : –
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस VJNT सेलची राज्यस्तरीय कार्यकारणीची बैठक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी टीळक भवन मुंबई येथे उत्साहात पार पडली . बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस – विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. मदनभाऊ जाधव हे होते .
बैठकीला उपस्थीतीत संपुर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी बैठकीत विविध विषयांवर आपली मते व विचार मांडले.
सदर बैठकीत VJNT समाजाच्या अनेक समस्यांवर तसेच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढील वाटचालीबाबत सकारात्मक चर्चा झाली.
सदर बैठकीस संपूर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीला काँगेस VJNT सेल प्रदेशाध्यक्ष मदनभाऊ जाधव यांनी मार्गदर्शन केले .