GM NEWS ,FLASH: शेतकरी बांधवांसाठी महत्वाचे : – प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या लाभासाठी आधारकार्ड जोडण्याकरीता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत .

0
241

जळगाव, दि. 23 (मिलींद लोखंडे ):- जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना फेब्रुवारी, 2019 पासुन राबविण्यात येत आहे. शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेसाठी (PM-KISAN) सर्व शेतकरी कुटूंबाची माहिती PM-KISAN पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी पात्र शेतकरी लाभार्थ्यांना सदर योजनेचा तीन टप्पयात लाभ प्राप्त झालेला आहे.
शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे चौथ्या टप्प्यापासून लाभ देतांना पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे PM-KISAN पोर्टवरील नांव व आधार कार्डवरील नाव सारखे असणे अनिवार्य आहे. जळगाव जिल्ह्यातील एकुण नोंदणी झालेल्या 3 लाख 91 हजार 466 लाभार्थ्यांपैकी 1 लाख 31 हजार 834 इतक्या लाभार्थ्यांचे नांव आधार कार्डप्रमाणे PM-KISAN पोर्टलवर नाही. यासाठी पात्र लाभार्थी शेतकरी यांनी शासनाच्या www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील Farmers Corner या लिंकमध्ये जाऊन Edit Aadhar Failure Record मध्ये आपला आधार क्रमांक टाकावा. जर लाभार्थ्यांचे नाव आधारकार्ड प्रमाणे बरोबर असेल तर Record not found for correction or It has corrected असा संदेश येईल. म्हणजेच त्या लाभार्थ्यांचे नांव आधार कार्ड प्रमाणे बरोबर आहे.
जर आधार कार्डवरील नाव आणि PM-KISAN पोर्टवरील नावात तफावत असेल तर सदर नांव Edit (दुरुस्ती) करणेसाठी उपलब्ध होईल. नंतर लाभार्थी यांना आपल्या आधार कार्डवरील नावाप्रमाणेच (Spelling/Space/Small/Capital Letter इ. जसे आहे तसेच) Farmer Name Update करणे आवश्यक आहे. सदर दुरुस्ती स्वत: लाभार्थी यांना किंवा माहितीगार व्यक्तीकडून करता येईल. लाभार्थी यांना मोबाईलचा वापर करुन सुद्धा आपले नांव Update करता येईल.
याशिवाय सदर कामासाठी आपल्या गावाचे तलाठी यांचेकडे ज्या नांवाची दुरुस्ती करावयाची आहे. अशा यादी पुरविण्यात आली असून लाभार्थी हे त्यांचे नावाची दुरुस्ती तलाठी यांचेमार्फत सुद्धा करुन घेऊ शकतात. PM-KISAN पोर्टलवरील नांव आधार कार्ड प्रमाणे अद्ययावत करणेबाबतची कार्यवाही 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंतच करावयाची आहे. तसेच सदर नाव Update करणेबाबतची सुविधा PM-KISAN पोर्टलवर निशुल्क उपलब्ध आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.