ग्रेट मराठी न्युज, अभिनंदनीय वृत्त : जामनेर तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात अजुन एक मानाचे मोरपंख ! कुंभारी येथील साई प्रभाकर साळवे याने कराटे स्पर्धेत पटकवले सुवर्ण पदक. सर्वच स्तरातुन साईचे होतेय अभिनंदन !

0
897

जामनेर,दि. 22 ( मिलींद लोखंडे ) : –
औरंगाबाद येथे नुकत्याच पारपडेलेल्या राज्यस्थरीय कारटे स्पर्धेत कुंभारी ता.जामनेर येथिल साई प्रभाकर साळवे याने सुवर्णपदक पटकावले आहे .स्पर्धेत एकुन 312 सार्धकांनी सहभाग नोंदवला होता. यात साईने उत्कृष्ठ खेळ खेळत सुवर्णपदक प्राप्त केले आहे .साई या अगोदर सुद्धा हिमाचल प्रदेश येथे महाराष्ट्राकडुन खेळण्यासाठी गेला होता. कुंभारी गाव खेळा साठी नावाजलेले आहे. पुर्वी गावात कुस्ति हा खेळ खेळल्या जायाचा .साई हा संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर साळवे यांचा मुलगा आहे.या विजया बद्दल गावातिल सरपंच गयाबाई जोशि .मा.सरपंच सुरतसिंग जोशि.विरेंद्र राजपुत .राजकुमार जोशि.सुनिल मोरे. व गावातिल नागरीकांनी अभिनंद केले .व पुढील वाटचालिस शुभेछ्या दील्या. साईला त्याचे शिक्षक असिफ शेख यांचे मार्गदर्शन लाभले .
ग्रेट मराठी न्युज परिवाराच्या वतीने सुद्धा साई साळवे याचे मनपुर्वक अभिनंदन !