ग्रेट मराठी न्युज ( GM NEWS ), उद्घाटन वृत्त : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महुखेडा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन ! महुखेडा गावासाठी ४ कोटी रुपयांचा विकास निधी.

0
22

जामनेर,दि. १७ ( मिलींद लोखंडे ) : तालुक्यातील महुखेडा येथे आज १७ रोजी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते चार कोटीचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले . या विविध विकास कामांमध्ये जनजीवन मिशन २६ लाख, व्यायामशाळा ३० लाख ,पानद रस्ते ५० लाख ,काँक्रीट रस्ता १० लाख, काँक्रेट गटार अंडरग्राउंड १० लाख ,स्मशानभूमी १० लाख ,महुखेडा ते मुंदखेडा रस्ता डांबरीकरण करणे २कोटी ५० लाख रुपये असे एकूण ४ कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते आज करण्यात आले . यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मंत्री महाजन यांनी सांगितले की, ही सर्व काम लवकरात लवकर पूर्ण करून आणखी गावाची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम करू.यावेळी जामनेर भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर तसेच जे के चव्हाण व नवल राजपूत वाघारी बेटावद गटाचे जिल्हा परिषद सदस्य विलास भाऊ तसेच भाजपा तालुका सरचिटणीस आनंदा लाव्हरे यांच्यासह सरपंच भरत गब्रू राठोड उपसरपंच कमलबाई पवार तसेच ग्रामपंचायत सदस्य रोहिदास चव्हाण अनिल पवार कविता पाटील पप्पू पवार सूर्यभान भिल यांच्यासह ग्रामसेवक मिशन पाडळसे सुनंदा प्रल्हाद पाटील माजी सभापती आनंदा वाघ निरंजन वाघ आत्माराम लाव्हरे माणिकराव पाटील सचिन लाव्हरे शामराव पाटील भागवत पाटील प्रल्हाद गुरुजी यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते .