*ग्रेट मराठी न्युज ( GM NEWS ), कृषी समस्या वृत्त :* *गहु हरभरा पिकांना विमा संरक्षण मात्र मका,ज्वारी,सुर्यफुल,हरभरा इतर रब्बी पिके मात्र विमा संरक्षणा पासुन वंचित.*

0
48

तोंडापूर ता .जामनेर दि, १७ ( सतिष बिऱ्हाडे ) : तोंडापूर सह परिसरासह जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या वतीने गहू व हरभरा पिकाचे शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पिक विमा नोंदणी ऑनलाईन भरण्यात आले आहेत.मात्र गेल्या तिन वर्षां पासून मुबलक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनि रब्बी हंगामात मका ज्वारी सूर्यफूल या सारखी इतर पिकाची लागवड केली आहे .हजारो हेक्टर पिक मात्र पिक विम्याच्या सरक्षंण पासून वंचित राहत आहेत या पिकाचा सुद्धा समावेश पिक विम्यात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वेगातून होत आहे .

गेल्या तिन चार वर्षांत अवकाळी पावसामुळे धरणे नदी विहिरीत पाणी पातळी मुबलक राहत असल्याने रब्बी च्या हंगामात गव्हाच्या पिका सोबत मका ज्वारी सूर्यफूल कांदा हरभरा बाजरी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे या खरिपाच्या हंगामात पावसाच्या अनियमित पनानुळे शेतकऱ्यांन चि अवस्था बिकट झाली आहे शेतकऱ्यांना शेतात लावलेल्या पिकाचा खर्च हातात न आल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे दिवाळीच्या सुमारास पडलेल्या पावसाने धरण व विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रब्बी च्या हंगामात गहु व मका ज्वारी सूर्यफूल हरभरा या पिकाची लागवड केली आहे शासनाच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेत आन लाईन गहु व हरभरा याच पिकाचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे इतर पिकाचा शेतकऱ्यांना विमा भरता येत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती येवून या पिकाचे नुकसान झाल्यास पुन्हा शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागनार आहे शासनाच्या नियमानुसार जे शेतकरी पिकाचा विमा काढतील त्यानाच नुकसान भरपाई मिळेल असे असतांना मात्र इतर पिकाचे काय असा प्रश्न शेतकरी याच्यापुढे उभा राहिला आहे त्यामुळे सर्वच पिकाचा पिक विम्यात समावेश करण्यात यावा अशी मागणी होत आहे  

तोंडापूर परिसरात शेतकरी राम अपार यांनी स्वताच्या शेतात एक एकर ज्वारी व एक एकर मका लावण्यात आली आहे विमा भरण्यासाठी गेले असता फक्त गहु व हरभरा विमा आन लाईन असल्याने त्यांना विमा भरता आला नाही 

खरिपाच्या हंगामात कापसाचा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड असल्याने व वन्यप्राणी याच्याकडून पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी ज्वारी या पिकांची लागवड न करता रब्बी च्या हंगामात ज्वारीचि लागवड करत आहे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात मका पिकाची लागवड होत असतांना मात्र कृषी विभागाच्या वतीने आन लाईन यादी मका पिकाचा समावेश न केल्याने शेतकऱ्यांन वर अन्याय होत आहे त्याच्या पिकाला सरक्षंण मिळत नसल्याने मका ज्वारी सूर्यफूल व इतर पिके पिक विम्याच्या सरक्षंण पासून वंचित राहत आहे