ग्रेट मराठी न्युज,GM NEWS,आंदोलन वार्ता: माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात मंगळवारी जळगावात ‘भव्य आक्रोश मोर्चा’चे आयोजन जिल्ह्यातील प्रमुख मागण्यांसाठी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात ‘भव्य आक्रोश मोर्चा’चे आयोजन

0
54

जळगाव,दि.१० ( मिलींद लोखंडे ) : –
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी भाजपच्या वतीने मंगळवार १२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आज जि.एम फाउंडेश येथे झालेल्या बैठकीत आमदार गिरीष महाजन यांनी शेतकऱ्यांच्या संयमाची शासनाने अंत पाहु नाका शेतकऱ्यांच्या संयम आता संपला असुन यांच्या उद्रेकाची वेळ आली आहे लोकप्रतिनिधीनी या कठीण काळात शेतकऱ्यां करता रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले …
दि.12 रोजी च्या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री आमदार गिरीश महाजन हे करणार आहे. मोर्चास सुरुवात दुपारी 2 वाजता जि. एस. ग्राऊंड येथुन होईल

जळगाव जिल्ह्यात अलिकडच्या काळात शेतकऱ्यांना नियमानुसार पुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या कृषिपंपाना वेळेवर वीजपुरवठा करावा अशी मागणी वारंवार केली गेली परंतू याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. दोन दिवसांपुवी खासदार उन्मेश पाटील यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी भेट घेवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात निवेदनही देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या कृषिपंपाना अखंडीत वीजपुरवठा करावा, या मागण्यांसाठी मंगळवार १२ एप्रिल रोजी माजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला जिल्ह्यातील शेतकरी, भाजपाचे नेते, भाजपचे जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन, माजी मंत्री आमदार
गिरीश महाजन, खासदार उन्मेश पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी,
जिल्हाउपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन प्रल्हादभाऊ पाटील पी सी आबा पाटील महेश बापू पाटील के बी सांळुखे जिल्हासरचिटणिस मधुभाऊ काटे जिल्हा संघटन सरचिटणिस सचिन पानपाटील विशाल त्रिपाठी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन रविद्र पाटील भरत महाजन दीपक साकरे सुनील काळे आरिफ शेख आदींनी केले आहे.