ग्रेट मराठी, GM NEWS, धार्मीक वृत्त : भारतीय बौद्ध महासभेचा वर्धापन दिन गुगल मीट द्वारा ऑनलाईन पद्धतीने उत्साहात साजरा.

0
133

जामनेर,दि.4 ( मिलींद लोखंडे ) : –
04 मे 2022 बुधवार रोजी The Buddhist society of India तथा भारतीय बौद्ध महासभेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्या कारित ऑन लाइन गूगल मिट द्वारे कार्यक्रम आयोजित केला होता.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष आद. मोहन इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचा वर्धापन दिन ऑनलाइन (गुगल मिटवर) अनोख्या पद्धतीने साजरा केला .जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या ऑनलाईन कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
मुख्य मार्गदर्शक डॉ सुरेश सुरवाडे सर यांनी सर्वांना समजेल अशा साध्या सरळ भाषेत मार्गदर्शन केले. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजरत्न आंबेडकर साहेब यांचे व संस्थेचे व्हिजन, मिशन व संस्थेचे १० उद्दिष्टे यावर डॉ सुरेश सुरवाडे यांनी सखोल मार्गदर्शन केले.
या वर्धापन दिनाच्या मंगल प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कृतियुक्त प्रतिसाद म्हणजेच आपल्या शिक्षण संस्थांची स्थापना करणे हा विचार पुढे आला. नायब तहसीलदार आद. शशिकांत इंगळे साहेब व मुख्याध्यापक तथा जिल्हा उपाध्यक्ष आद. जे पी सपकाळे यांनी दुजोरा देत पुढच्या वर्धापन दिनाच्या मंगल प्रसंगी आपल्या प्राथमिक शिक्षण संस्थेचे उद्घाटन होईल असे जाहीर केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्रराज्य कोषाध्यक्ष आद. आर पी तायडे साहेब, महाराष्ट्रराज्य कार्यकारणी सदस्य आद. महेंद्र मेढे सर आणि नाशिक विभागीय अध्यक्ष आद. अशोक पटाईत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शाखेचे अध्यक्ष मोहन इंगळे यांनी केले.
सूत्र संचालन जळगाव जिल्हा महिला प्रमुख आयु, प्रमिला ताई भालेराव यांनी केले.
प्रमुख अतिथी R.P. तायडे साहेब, यांनी आम्हाला मार्गदर्शन केले व ऑनलाईन पद्धतीने वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित केला हा महाराष्ट्रातील अभिनव प्रयोग झाला असे मत व्यक्त केले.
आयु,ईश्वर खंडारे साहेब यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमास सौरभ अवचारे,दिनेश मोरे,जयश्री इंगळे,प्रतिभा निकम,तालुकाध्य बोधिसत्व अहिरे,विजय तायडे यांचेसह बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.