ग्रेट मराठी न्यूज,GM NEWS,न्यायालयीन वृत्त : जामनेर तालुक्यातील पहूर ग्रामीण रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यास एक वर्षाचा सश्रम कारावास . जामनेर न्यायालयाने ठोठावला पाच हजारांचा दंड .

0
54

पहूर , ता .जामनेर दि . १९ (प्रतिनिधी ) जामनेर तालुक्यातील पहुर ग्रामिण रूग्णालयातील तत्कालीन वैदयकीय अधिकारी डॉ.जितेंद्र प्रल्हाद वानखेडे यांना सहकारी वैदयकीय अधिकाऱ्याचा विनयभंग केल्या प्रकरणी येथील न्यायालयाने त्यास १ वर्ष सक्त मजूरीची शिक्षा व ५ हजार रू दंड ठोठावला आहे .
या प्रकरणी गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी की , दि ०२/०६ /२०२१ रोजी पहुर येथील ग्रामीण रूग्णालयात पिडीता ही कर्तव्यावर असताना आरोपी डॉ . जितेंद्र प्रल्हाद वानखेडे हा त्याची डयूटी नसताना रात्री १२.३० च्या सुमारास रूग्णालयात आला व पिडीता आराम करत असलेल्या खोलीचा दरवाजा ठोकुन तिला दार उघडण्यास सांगीतले व तीला आरोपीच्या बायकोचा वाढदिवस असल्याने पिडीते साठी रोस्टेड चिकन आणले असे सांगितले पिडीतेने त्यास नकार दिला असता तो वारंवार तिला चिकन खानेसाठी आग्रह करत होता आरोपी हा दारूच्या नशेत असल्याने पिडीतेने पार्सल ताब्यात घेवून परत दार लावून घेतले त्यानंतर थोड्यावेळाने पून्हा आरोपीने तिला रात्री १.०० च्या सुमारास फोन करून वॉटसॉपवर यायला सांगितले व त्यानंतर आरोपी पुन्हा रात्रभर तिला दारू पिण्यासाठी आग्रह करत होता वारंवार आरोपी मॅसेज करून त्रास देत असल्याने पिडीतेने तिच्या सहकारी डॉक्टरांना फोन करून सदरची हकीकत सांगितली असता त्यांनी त्याठिकाणी येवून आरोपीस बाहेर काढून पिडीतेला आतून दार लावण्यास सांगितले त्यांनतर फिर्यादीने पहूर पो.स्टे . येथे विनयभंगाची तक्रार दाखल केली . सदरचा खटला हा येथील न्यायाधिश डी.एन. चामले यांचे समोर चालला त्यात सरकारपक्षा तर्फे एकुण ६ साक्षिदार तपासले सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस उप . निरीक्षक अमोल देवढे यांनी केला होता सरकारपक्षा तर्फे सौ . कृतिका भट यांनी भक्कम युक्तीवाद करून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा व्हावी जेणेकरून अशा प्रकारचे गुन्हे करणा – याना जरब बसेल व त्याचा समाजात चांगला संदेश जाईल न्यायालयाने सरकारपक्षाचा युक्तीवाद मान्य करून आरोपी वैदयकीय अधिकारी डॉ . जितेंद्र प्रल्हाद वानखेडे यास वरील प्रमाणे शिक्षा सुनावली सरकारी वकील सौ . कृतिका भट यांना पैरवी अधिकारी पो.हे.कॉ मनोज बाविस्कर व केसवॉच पो.हे.कॉ. राजेंद्र रामलाल परदेशी यांनी मदत केली .