ग्रेट मराठी न्युज (GM NEWS),दिन विशेष : संत गाडगेबाबा व आचार्य गजाननराव गरुड यांच्या स्मृती प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा . ———————————- स्वच्छता मोहीम राबवत केले वृक्षरोपण . ———————————-

0
28

तोंडापूर ता जामनेर,दि,२० (सतिष बिऱ्हाडे )  : 

 तोंडापूर ता. जामनेर येथील श्रीमती र सु जैन माध्यमिक विद्यालयात् विधान सभेचे माजी उपसभापती तथा शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे संस्थापक गजानराव गरुड यांची 39 वी पुण्यतिथी तसेच संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या तसेच शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच वाकोद गावचे भूमिपुत्र पद्मश्री भवरलाल् जैन यांच्या 86 व्या जयंती निमित्त वाकोद सह परिसरात जैन हिलंस जळगावं येथून मिळालेल 86 रोपा पैकी 20 रोपे तोंडापूर विद्यालयात् स्मृती दिनी वृक्षरोपण करण्यात आले आचार्य गजानन गरुड 

विधानसभा उपसभापती झाले तेव्हा तोंडापूर गावात मोठे जंगी स्वागत करण्यात आले होते असे जुन्या आठवणी ना उजाळा देतांना हरी भक्त नामदेव महाराज पल्हाळ यांनी सांगितले हत्ती या निशाणीवर त्यांनी सर्व प्रथम निवडणूक लढवून विजय संपादन केला असल्याचे सुनील पाटील यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले 

                कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ह भ प नामदेव महाराज पल्हाळ होते व्यासपीठावर स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील कुंभारी बू येथील माजी सरपंच सुरतसिंग जोशी नाना पाटील पितंबर पाटील दत्तात्रय कानडजे कैलास कोळी सतीश बिर्हाडे मुख्याध्यापक एन जि नाईक पर्यवेक्षक पी डी रोनखेडे यांचेसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा व अचार्य गजाननराव गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन व माळ्यार्पण करून करण्यात आले

       याप्रसंगी शालेय परिसरात जैन हिल्स येथील नर्सरी मधून पद्मश्री भवरलाल् जैन यांच्या जयंती निमित्त मिळालेल्या 20 रोपंचे वृक्षरोपण मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले  

           कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक एन जी नाईक यांनी केले यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा दोन गटात घेण्यात आली इयत्ता पाचवी ते सातवी च्या गटातून प्रथम – साक्षी मधुकर काटकर द्वितीय प्रणव शिंदे तर तृतीय श्रद्धा संदीप आढाव

तसेच आठवि ते दहावी गटात 

प्रथम उज्वला मधुकर काटकर 

द्वितीय आचल सुभाष तांगडे

तृतीय भूमिका भागचंद जैन व किरण रामचंद्र गव्हारे व तनिषा गोसावी यांनि वक्तृत्व स्पर्धेत यश संपदन केले या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र व पेन देऊन गौरव करण्यात आला 

        यावेळी पर्यवेक्षक पी डी रोनखेडे एस पी पाटील सुरतसिंग जोशी दिगंबर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर नामदेव महाराज यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलणं आर सी लोडते यांनी केले तर आभार एस एस देशमुख यांनी मानले.