ग्रेट मराठी न्युज,GM NEWS, धार्मिक वृत्त : तळेगांव – शेळगाव वाशियानी घडविले माणुसकीचे दर्शन.. ट्रकच्या धडकेत मृत माकडावर केले विधीवत अंत्यस्कार .

0
691

तळेगाव ता.जामनेर ता.१६ (प्रतिनिधी ) : –

तळेगांव/शेळगाव येथे माणुसकीचे दर्शन घडविणारी घटना गावकऱ्यांच्या सहकार्याने घडली असून अज्ञात ट्रकच्या धडकेने मृत पावलेल्या माकडावर गावातील जागरूक नागरिकानी अंत्यविधीसह तिसऱ्या दिवशी सारी, सातव्या दिवशी दशक्रिया विधी तर तेरवी चा सुध्दा कार्यक्रम समस्त बेलेश्वर नगर कै.युवराज पाटील शळेगाव यांच्या राहत्या घरुन करण्यात आला मांसातली माणूसकी विसरलेल्या लोकांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे. आजच्या घडीला लोक माणसा- माणसा पासून दुर जात असताना मात्र तळेगांव/शेळगाव वासियांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.. योग्य ती दक्षता घेऊन माणुसकी देखील जपायची आहे. म्हणून माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हेच जीवनाचे खरे सत्य आहे. मनोज पा अमोल झटकवळे, रामलाल महाजन, पाटिल , मगंल जिरी ,दिलीप भोरकळे, जालीदर पाटील, भास्कर पाटिल,सदिप पाटिल, समस्त बेलेश्वर नगर शळेगाव याच्या उपस्थित दशक्रिया विधीत, केस दिले तर समस्त बेलेश्वर नगर शळेगाव यांनी वरगणीतुन तेराव्याचा गावातील २५० लोंकाचा पंगतीचा कार्यक्रम संपन्न झाला.