जामनेर,दि. १९ ( मिलींद लोखंडे ) : –
झाडे लावा … झाडे जगवा अभियानार्तंगत जामनेर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये वृक्षारोपन करण्यात येणार आहे .शिक्षण विभागाच्या सहकार्याने हिवरखेडा बु. येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार सुरेश पाटील स्वखर्चाने हा प्रेरणादाई स्तुत्य उपक्रम राबवित आहेत.झाडे लावा , झाडे जगवा अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड मोहीमेत सहभागी होऊन अभियान यशस्वी करण्यासाठी वृक्ष आपले मित्र या उक्तीनुसार झाडे आपणास ऑक्सीजन , फळे , फुले , सावली यांसारख्या अनेक गोष्टी विनामुल्य देतात , परंतु आज विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्यामुळे पर्यावरणाचा हास होऊन पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस बिघडत आहे . त्यामुळे सर्व सजिवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . पर्यावरणाचे संतुलन अबाधीत रहावे या उदात्त हेतुने निसर्गप्रेमी श्री . तुषार सुरेश पाटील यांच्या योगदानातुन व शिक्षण विभाग , पंचायत समिती , जामनेर यांच्या सहकार्याने जामनेर तालुक्यातील सर्व जिल्हा परीषद शाळा व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमाच्या माध्यमातुन मोफत रोपवाटप व वृक्षलागवड अभियान राबविण्यात येणार आहे .
या वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी सहभागी होवुन अभियान यशस्वितेसाठी सहकार्य करावे ही आग्रहाची नम्र विनंती श्री . तुषार सुरेश पाटील , ( सामाजिक कार्यकर्ते ) संपर्क : ८८८८४४४४४८ यांनी केली आहे .