ग्रेट मराठी न्युज,GM NEWS,गुन्हे वार्ता: जामनेर तालुक्यातील गोद्री येथील८५ वर्षीय महिलेचा दागिन्यासाठी खुन प्रकरणी संशयीतास भारूडखेड्यातून पोलीसांनी घेतले ताब्यात. तीन दिवसाची पोलीस कोठडी .

0
32

फत्तेपूर ता.जामनेर दि.२६ जुन,२०२२.
______________ फत्तेपूर प्रतिनिधी________
येथून जवळ्चअसलेल्या गोद्री येथीलआदिवासी
८५-वर्षीय महिलेचा आरोपीने रात्रीच्या दरम्यान
घरात प्रवेश करून महिलेचा गळा दाबून अंगा- -वरील दागिने जबरीने काढून वृद्ध महिलेस जिवेठार मारलेले आहे.या प्रकरणी पहूर पोलीसानी तपास चक्रे फिरवली व गुप्त माहिती
च्या आधारे आरोपीस ताब्यात घेतलेले आहे.या
घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.आरोपीस न्यायालयात हजर केले असता
तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गोद्री येथे
मानबाबाई सरदार तडवी(वय-८५), ही मोठा मुलगा बलदार तडवी यांचेकडे राहात होती. त्यांच्या पिठाच्या गिरणीजवळ असणाऱ्या पत्राच्या खोलीत ही वृद्ध महिला रात्रीच्या वेळेस
एकटीच झोपत होती.नेहमी प्रमाणे ती रात्री झोपण्यास गेली नातवाने जेवनाचा डबा आणून
दिला.दहा वाजता नातू आजीशी गप्पा मारून
निघून गेला.सकाळी दहा वाजेपर्यत सासू आली
नाहीं म्हणून सुन या खोलीकडे आली.त्या वेळेस सासू हालचाल करीत नाही.संशयास्पद
खाटेवर दिसून आली.तिने पती व इतर मुलाना
बोलावून झालेला प्रकार सांगितला.सर्व जण
जमा झाले तेव्हा आईच्या अंगावर असणारे सोने-चांदीचे दागिने सुद्धा काढलेले दिसले. म्हणून त्यांनी हा प्रकार फत्तेपूर पोलीसांना सांगितला.पोलिस घटनास्थळी गेले तर झालेला
प्रकार संशयास्पद वाटला.त्यांनी रितसर पंचनामा करून हा घटनाक्रम वरिष्ठांच्या सांगितला.त्या वेळेसअतिरिक्त पोलीसअधिक्षक
चोपडे,उपविभागीय पो.अधिकारी भरत काकडे
स्थानिक गुन्हे अन्वये विभागाचे पो.उपनिरिक्षक
अमोल देवडे,अंगुलीमुंद्रा पथक,श्वान पथक, न्याय वैघता पथक,पहुर पो.स्टे.चे प्रभारी पो. नि.किरण शिंदे, पो.उपनिरिक्षक एस.पी. बनसोड, संदीप चेडे,पोहेकॉ किरण शिंपी, प्रवीण चौधरी,दिनेश मारवाडकर आदीनी घटना स्थळी काही संशयास्पद वस्तु जप्त करून श्वान पथकाकडून तपास करण्याचा प्रयत्न केला. त्या दिशेने तपास सुरु झाला.
गुप्त माहिती आधारे पो.नि.प्रताप इंगळे,
पो.उपनिरिक्षक संदीप चेडे,श्रीराम ठाकरे,विजय
सानप,ईश्वर देशमुख,गोपाळ माळी,किरण शिंपी
कोकणे,या पथकाने भारूडखेडा येथे गुरुवारी सापळा रचला व बब्बु सांडू तडवी(वय-२७)रा. भारूडखेडा ता.जामनेर यास ताब्यात घेतले.
आरोपीने महिलेचे दागिने काढणेसाठी रात्रीच्या
वेळेस महिलेच्या घरात प्रवेश करून गळा दाबून
अंगावरील दागिने जबरीने काढून जीवाने ठार मारले.महिलेच्या कानात दोन सोन्याच्या बाळ्या
चार ग्रॉमच्या किंमत-२०,००० रुपये,हातातील दोन चांदीच्या पाटल्या वीसभार किमंत-१२६००
रुपये एकून-३२६०० रुपयाच्या दागिन्या साठी
महिलेचा खून झालेला आहे. बब्बू सांडू तडवी हा भारूडखेडा येथील रहिवासी असून त्यांची
गोद्री सासरवाडी असल्याने त्यांचे या गांवात
येणे जाणे होते.तो व्यसनाधीर आहे.गोद्री येथे
आल्यानंतर त्याने-८५ वर्षीय महिलेच्या अंगा वरील सोने-चांदीचे दागिने पाहीलेले होते. तो जुगारात पैसे हारला होता.याच पैशासाठी त्याने हा डाव रचला होता.आणि या महिलेला दागिन्यासाठी जीवाने मारले.आरोपीने दागिने
विक्री ठिकाण व फोटो, त्यातुन मिळालेले पैसे,
अशा अनेक बाबी पोलीस तपासातून समजल्या
आहेत. दुसऱ्या दिवशी तपास करून पहूर पोलीस स्टेशनचे पो.नि.प्रताप इंगळे व पथकाने
खुनाची घटना उघडकीस आणून आरोपीस गजाआड केले आहे. आरोपीस तीन दिवसाची
पोलीस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी शेनफडाबाई बलदार तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध पहूर
पोलीस स्टेशनला गु रं नं.-२२९/२०२२
अन्वये भादवी कलम-३०२,३९४,४५७ प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पो.नि.प्रताप इंगळे, येथील पोहेकॉ किरण शिंपी,प्रवीण चौधरी, पो.नाईक दिनेश मारवाडकर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × three =