GM NEWS , Big Breaking: जळगांव जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत 13 डिसेंबर रोजी .

0
136

जळगाव, दि. 4( मिलींद लोखंडे ) : – ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील अधिसूचनेद्वारे जळगाव जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सद्यस्थितीत लागू असलेल्या सभापती पद आरक्षणाच्या समाप्तीनंतर पुढील उर्वरित कालावधीसाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यांचेसाठी सोडत पध्दतीने आरक्षित आरक्षण ठरविण्यासाठी 13 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती क्षेत्रातील ज्या नागरिकांना सदर सभेस उपस्थित राहण्याची इच्छा असेल, अशा नागरिकांनी आरक्षण सोडत सभेस वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.