ग्रेट मराठी न्युज,GM NEWS: इंदोरहुन-अमळनेर कडे येनारी बस पुलाखाली कोसळली,13 जनांचा मृत्यु. 30 ते 35 प्रवाशी बुडाल्याची शक्यता. मदतीसाठी जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयाचे हेल्पलाईन क्रमांक :09555899091 0257 – 2223180 /0257 – 2217193

0
131

जळगांव,दि. 18 ( प्रतिनिधी ) : –

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर आगाराची इंदौर अमळनेर बस क्रमांक एम एच 40 एन 9848 ही आज दि . 18 जुलै , 2022 रोजी सकाळी 07.30 वा . इंदोर येथुन अमळनेर कडे मार्गस्थ झाली . आज सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर सदर बस अपघातग्रस्त होवुन नर्मदा नदीत कोसळल्याची दुःखद घटना घडली आहे. घटनास्थळी खरगोन व धार चे जिल्हा प्रशासन पोहोचले असुन बस क्रेन च्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे . झालेल्या या अपघातात 13 प्रवाशांचे दुःखद मृत्यु झाला आहे तर नदीत बुडालेल्या बाकी प्रवाशांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे तर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करणेत येवुन त्यांचेवर उपचार सुरु आहेत . त्यांचे प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेणेचे काम सुरु आहे . आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतुने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे . हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळी मदतीसाठी 09555899091 जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 02572223180 , 02572217193 . श्री.अभिजीत राऊत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जळगाव.