ग्रेट मराठी न्युज,GM NEWS,अभिनंदनीय वृत्त : भुसावळ जवाहर नवोदय विद्यालयाचा बारावी आणी दहावीचा 100 % निकाल !

0
127

भुसावळ,दि. 27 ( मिलींद लोखंडे ) : –

जवाहर नवोदय विद्यालयाच्या बारावीचा 100 % निकाल केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षा बोर्ड , नवी दिल्ली द्वारा मे जून 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल दिनांक 22/07/2022 रोजी जाहीर झाला . यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय , साकेगाव तालुका- भुसावळ , जिल्हा- जळगावचा निकाल 100 % लागला . या परीक्षेत एकूण 40 विद्यार्थी बसले होते . हे सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले व चाळीस पैकी 30 विद्यार्थी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाले कुमारी हर्षला महाजन व तेजस महाजन यांनी 500 पैकी 470 गुण घेऊन 94 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला भावेश पाटील यांनी 92.4 % गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर कल्पेश चौधरी यांनी 89.2 % गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला  आहे.

यासोबतच केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षा बोर्ड , नवी दिल्ली द्वारा मे जून 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल दिनांक 22/07/2022 रोजी जाहीर झाला . यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय , साकेगाव तालुका भुसावळ , जिल्हा जळगावचा निकाल 100 % लागला . या परीक्षेत एकूण 82 विद्यार्थी बसले होते . हे सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले व 96.25 % विद्यार्थी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाले कुमारी महती सराफ हिने 500 पैकी 477 गुण घेऊन 95.4 % गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला व प्रणव पाटील यांने 94.8 % गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर देवेश कुमावत व प्रांजल पाटील यांनी 94.6 % गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला सदर प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचे व सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि विद्यालयाचे चेअरमन श्रीमान अभिजीत राऊत , विद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर . आर . खंडारे उपप्राचार्य पी . आर . कोसे यांनी व विद्यालयाचे सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

आमच्या GM NEWS परीवाराच्या वतीने सुद्धा या गुणवंत विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन !