GM NEWS ,FLASH: शंकर भामेरे यांना समता शिक्षक पुरस्कार प्रदान

0
96

पहूर ता .जामनेर ,४ (संतोष पांढरे) :- येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशिल शिक्षक शंकर रंगनाथ भामेरे यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे प्रबोधनकार अॅड .मुक्ता दाभोळकर यांच्या हस्ते तात्यासाहेब जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला .
यावेळी समता शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ, शिक्षणाधिकारी , परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते .
जळगांव येथे अल्प बचत भवनात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता .शंकर भामेरे यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे .