ग्रेट मराठी न्युज,GM NEWS,FLASH: जि.प. निवडणुकीचे जामनेर तालुक्यातील सर्व 8 गट राखीव तर 6 गटांसह 2 गटात सुद्धा चालणार महिलाराज. इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणीला सुरुवात.

0
593

जामनेर,दि.28 ( मिलींद लोखंडे ) : – जळगांव जिल्हा परीषद पंचवार्षीक निवडणुकीच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकी साठीच्या आरक्षणाची सोडत आज नुकतीच पार पडली. यात जामनेर तालुक्यातील सर्व 8 जि.प गटांचे राखीव आरक्षण निघाले आहे. तर सर्वच जागांवर महिलाराज सुध्दा चालु शकणार आहे .
आरक्षण सोडत जाहीर होताच सर्व राजकीय इच्छुक उमेदवारांना उमेदवारीसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.
जामनेर तालुक्यातील 8 गटांमध्ये निघालेले आरक्षण असे 1- नेरी दिगर गट – ओबीसी(O.B.C) स्त्री / पुरुष/2 – खडकी – बेटावद गट – अनु . जमाती (S.T)महिला/ 3 – सामरोद – कापुसवाडी गट- अनु .जाती(S.C) महिला/ 4 – पाळधी – शहापुर गट- अनु . जाती(S.C) स्त्री / पुरुष/ 5- पहुर कसबे – नाचणखेडा – ओबीसी (O.B.C) महिला/ 6 – पहुर पेठ – वाकोद गट – ओबीसी ( O.B.C )महिला / 7- तोंडापुर- वाकडी गट – ओबीसी (O.B.C )महिला /8- फत्तेपुर- देऊळगांव गट- अनु जाती ( S. C )महिला असे आरक्षण निघाले आहे.
जामनेर तालुका हा भौगोलीकदृष्ट्या मोठा तालुका असुन राजकीय दृष्ट्या संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष या तालुक्याकडे लागुन असते. माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांची विधानसभा आणी जि.प सह . पं .स वर पकड असुन यापुर्वीच्या पंचवार्षीक मध्ये जामनेर तालुक्यातील नेरी येथील भाजपाचे नेते दिलीप खोडपे सर आणी तळेगाव येथील सौ. प्रयागताई कोळी यांनी जि.प अध्यक्षपद भुषविले आहे . तर शेंदुर्णी परीसारात रा.कॉ नेते संजयदादा गरुड यांचे प्राबल्य असुन ते विद्यमान जि.प सदस्य आहेत. यासोबतच महाविकास आघाडीचे घटक पक्ष रॉ.का, काँग्रेस, शिवसेना एकत्र न लढल्यास ते सुध्दा स्वंतत्र निवडणुक लढण्या शकण्याची शक्यता आहे .प्रहार जनशक्ती, वंचीत बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड यासह इतर पक्ष सुद्धा निवडणुक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
मात्र सद्याच्या राजकीय घडामोडी बघता शिवसेना शिंदे गट भाजपा राज्य सरकारच्या पुढील घडामोडी नंतरच राज्यातील सर्व जि.प निवडणुकांचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे .
त्या नंतर मिनी मंत्रालय म्हणुन ओळख असणाऱ्या जि.प वर नेमका कोणाचा झेंडा फडकतो हे येणारा काळ मात्र ठरवणार आहे .