ग्रेट मराठी न्युज,GM NEWS,🚨ALERT: १६-१७ ऑगष्टला जळगांव जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस! हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी जामनेर तालुक्यातील पाळधी येथे शेतकरी मेळाव्यात बोलतांना व्यक्त केला अंदाज.

0
842

पाळधी ता.जामनेर,दि.12 ( योगेश कोळी ) :- येथील स्वराज्य ग्रुपचे संस्थापक तसेच माजी सरपंच कमलाकर पाटील यांच्याकडुन प्रथमच पाळधी गावामध्ये भव्य शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.आज १० ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी माळी समाज मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मार्गदर्शन केले यात उपस्थित शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन तसेच पिकाची लागवडीची माहिती दिली जळगाव जिल्ह्यात १२ऑगस्ट ते १५ ऑगस्ट सूर्य दर्शन होणार आहे तर १६,१७ तारखेला जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती यावेळी दिली. कोणत्या वर्षी जास्त पाऊस पडेल तसेच कोणत्या वर्षी कमी पाऊस कसा पडेल, तसेच गारगोठ,तसेच विजा कशा व कशावर पडतात? याची माहिती शेतकऱ्यांना यांनी दिली व त्यापासून कसे संरक्षण करावे हे सांगितले तसेच जैन इरिगेशनचे डी.एम.बहाटे विभागीय व्यवस्थापक यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. तसेच पाळधीसह सोनाळा, भराडी,पहुर,भिलखेडा,रोटवद, सुनसगाव,माळप्रिंपी, गोडखेल,नांद्रा,सवतखेडा,मोरगावसह परिसरातील आदर्श शेती करणाऱ्या शेतकरी बांधवाचा ट्रॉफी ,शाल देऊन सत्कार करण्यात आला.तसेच या शेतकरी संवाद मेळाव्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

कार्यक्रमासाठी हवामान तज्ञ पंजाबराव डख,जैन इरिगेशनचे विभागीय व्यवसथापक डी.एम.बहाटे,माजी सरपंच कमलाकर पाटील, कृषी अधिकारी जामनेर अभिमन्यू चोपडे,भाजपा तालुका अध्यक्ष चंदू अण्णा बाविस्कर, सरपंच प्रशांत बाविस्कर ,माजी जि.प.सदस्य अमित देशमुख, बाबुराव घोंगडे, समाधान पाटील , राजमल भागवत, दिलीप खोडपे, उपसरपंच नीता पाटील,कृषी सहाय्यक अनिल गायकवाड, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ शेतकरी बांधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन रोकडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार माजी सरपंच डिगांबर माळी यांनी आभार मानले.