ग्रेट मराठी न्युज,GM NEWS,प्रेरणादाई वृत्त : सरपंच अशोक चौधरी आणि रा.काँ.महिला जिल्हाध्यक्षा सौ.वंदनाताई चौधरी यांच्या प्रयत्नाने कळमसरा गावातील जनावरांना मोफत लम्पी लसीकरण.

0
171

कळमसरा,ता.पाचोरा,दि.१८ ( विनोद बुळे ) : –

कळनसरा गावचे सरपंच अशोक चौधरी आणि रा.काँ.महिला जिल्हाध्यक्षा सौ.वंदनाताई चौधरी यांच्या प्रयत्नाने गावातील जनावरांना मोफत लम्पी लसीकरण करण्यात आले.

           लसीकरणाचा उपक्रम दि .१५/९/२०२२ रोजी पार पडला.यावेळी कळमसरा गावातील येथील मारोती पार येथे लसीकरण कार्यक्रमचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी पशुवैद्कीय अधिकारी डॉ. ए. आर.महाजन, डॉ एन आर पाटील, डॉ सुजाता सावंत, डॉ गौतम वानखेडे डॉ. प्रताप घुले, आणि इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.या प्रसंगी गावातील ग्रामपंचायत सदस्य, आणि गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

             या उपक्रमा अंर्तगत गावातील पशुधनांना लम्पी लस देण्यात आली. गावातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गुरा ढोरांसाठी या लसीकरणाचा लाभ घेतला.आपल्या गुरांना लस टोचून घ्यावी असे आवाहन सौ. वंदनाताई चौधरी आणी सरपंच अशोक चौधरी यांनी केले.