GM NEWS ,Breaking : जळगाव विमानसेवा लवकरच सुरळीत होणार .खासदार उन्मेश दादा पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांनी घेतली नागरी विमान महानिदेशक यांची भेट .नाईट लँडिंग मंजुरी व प्रत्यक्ष उपकरण उभारणी सुरू . येत्या नऊ तारखेला उपकरणांच्या चाचणी साठी केंद्रीय तज्ञ समिती देणार भेट . जळगाव विमानतळ कार्यालयास मिळाल्यात सूचना!

0
199

जळगाव दि.६. ( मनोज दुुसाने ) :- रात्रीचे विमानसेवा व खराब हवामाना मुळे अनेकदा विमानसेवेत बाधा निर्माण होत होती त्यातच गेल्या सप्ताहात विमानसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी.आणि तातडीने उच्च दर्जाची विमानसेवा प्रवाशांना बहाल करता यावी यासाठी काल दिल्लीत नागरी विमान मंत्रालयाचे प्रधान सचिव प्रदीपसिंग खरोला यांची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भेट घेतली होती. आज खासदार उन्मेश दादा पाटील आणि खासदार रक्षा ताई खडसे यांनी नागरी विमान महानीदेशक अरुणकुमार यांची भेट घेतली असून रात्रीची विमानसेवा तसेच खराब हवामानात विमानसेवेसाठी सादर केलेल्या प्रस्तावास त्वरित मंजुरी देण्याची मागणी केली आहे.त्याअनुषंगाने येत्या नऊ तारखेला उपकरणांच्या चाचणी साठी तज्ञ समिती भेट देईल असे त्यांनी सांगितले असून लवकरच जळगाव विमानसेवा सुरळीत होणार आहे. *असा विश्वास खासदार उन्मेश दादा पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केला आहे.*

*येत्या नऊ तारखेला उपकरणांच्या चाचणी साठी तज्ञ समिती देणार भेट*

जळगाव विमानतळावर रात्रीच्या विमानसेवेसाठी आणि मुखत्वे खराब हवामानात विमानसेवा सुरळीत चालू राहावी यासाठी सेकंड सर्किट ऑफ रनवे,ग्रेडींग ऑफ रनवे बेसिक स्ट्रीट,पापीज तसेच इतर यंत्रणेची उभारणी सुरू आहे. येत्या नऊ दिवसात केंद्राच्या तज्ञांची तपासणी आणि चाचणी समिती भेट देईल अश्या सूचना आज नागरी विमानसेवा महानिदेशक यांनी संबधित विभागाला दिल्या आहेत.

*नाईट लँडिंग विमानसेवेसाठी भक्कम पाठपुरावा*

जळगांव विमानतळावरून आवश्यक उपकरणांसह यंत्रणा अद्यावत करून मिळावी ही मागणी घेऊन गेल्या पंधरवाड्यात खासदार उन्मेश दादा पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांनी नागरी उड्डयन मंत्री ना. हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली व त्यांना निवेदनही दिले. त्यांनी सर्व समस्या समजून घेत नागरी विमानन महानिदेशक ( Director General Civil Avaition ) यांना आदेश दिले असून येत्या काळात पुणे व इंदोर विमानसेवा सुरू होण्याबाबत आश्वस्त केले आहे. जळगाव येथील विमानसेवेबाबत असलेले सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे तात्काळ आदेश दिले आहे.
यामुळे लवकरच जळगाव विमानतळावरून जळगावकरांना उच्च दर्जाची विमान सेवा अनुभवता येणार अशी आशा वाढली असतांना गेल्या सप्ताहात विमानसेवेत बाधा निर्माण झाली होती. त्यातच प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद असतांना दर्जेदार विमानसेवा मिळत नसल्याने जिल्हावासियांमध्ये खासदार उन्मेश दादा पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांनी भक्कम पाठपुरावा सुरू ठेवावा अशी मागणी जोर धरू लागली होती . काल खा.उन्मेश दादा पाटील यांनी प्रधान सचिव यांची भेट घेऊन कार्यवाही आत्ताच सुरू करावी अशी मागणी केली. प्रधान सचिव खरोला यांनी लागलीच संबधित यंत्रणेला आदेश देत कमीतकमी कालावधीत काम मार्गी लावावे अशा सूचना दिल्या होत्या. आज महानिदेशक अरुण कुमार यांनी पुढील कार्यवाहीचे आदेश दिल्याने जळगाव विमानतळावरील अडचणी दूर होणार आहेत.

*चांगल्या विमानसेवेसाठी आग्रही — खा. उन्मेश दादा पाटील*

जळगाव विमानतळाच्या नाईट लँडिंग विषयीचा प्रस्ताव मंजूर करून भक्कम पाठपुरावा सुरू ठेवला आहे. सात बलून बंधारे आणि जळगाव विमानसेवा या विषयी सर्व पातळीवर पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नागरी विमान मंत्रालय प्रधान सचिव यांची भेट घेतली. जळगाव विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधांसाठी करावयाच्या उपाययोजना तातडीने कराव्यात यासाठी आग्रह धरला त्यास प्रधान सचिवानी कार्यवाहीचे आदेश दिले होते. आज खासदार रक्षा ताई खडसे यांच्यासह नागरी विमानसेवा महानीदेशक अरुण कुमार यांची भेट घेतली . त्यांनी नऊ तारखेला जळगाव विमानतळावर केंद्रीय तपासणी आणि चाचणी समितीचे तज्ञ भेट देतील असे आदेश दिले आहेत.त्यामुळे लवकरच जळगाव विमानतळ हे देशात आघाडीचे विमानतळ म्हणून विकसित होईल. अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

*जळगाव विमानतळ कार्यालयास सूचना प्राप्त — विमानतळ संचालक मोंगिरवार*

काल खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नागरी विमान मंत्रालयाचे केंद्रीय प्रधान सचिव प्रदीप सिंग खरोला यांची भेट घेतली होती. तर आज खासदार उन्मेश दादा पाटील आणि खासदार रक्षाताई खडसे यांनी महानिदेशक अरुण कुमार साहेब यांची भेट घेतली आणि लागलीच तज्ञ समिती तपासणी व चाचणी करण्यासाठी नऊ तारखेला येत असल्याचे सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही पार पडणार असून उचित यंत्रणा उभारणी सुरू असल्याने लवकरच येथील विमानसेवा विनासायास सुरू राहील. दोन्ही मान्यवर खासदार यांनी केलेला भक्कम पाठपुरावा आणि नागरी विमान मंत्रालयाने दिलेल्या आदेशाने जळगाव विमानतळ लवकरच प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करेल अशी माहिती जळगाव विमानतळ संचालक सुनील मोंगिरवार यांनी व्यक्त केली आहे.