ग्रेट मराठी न्युज(GM NEWS),राजकीय बातमी: वंचित बहुजन आघाडी जळगांव पुर्व जिल्हा कार्यकारणी जाहिर ! जिल्हाध्यक्षपदी शमीभाताई पाटील यांची निवड.

0
47

जळगांव,दि.२३ ( मिलींद लोखंडे ) : – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकुर यांनी जळगांव पुर्व जिल्हा कार्यकारणी जाहिर केली आहे. जिल्हाध्यक्षपदी शमीभाताई पाटील यांची निवड करण्यात आली असुन समाजाने  नाकारलेल्या तृतीय पंथीयांला  सन्मानाचे जिल्हाध्यपद देणारा स्तुत्य निर्णय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतल्याने राज्यभरातील तृतीय पंथीयांसह समाजातील सर्व स्तरारातुन या स्तुत्य निर्णयाचे अभिनंदन होत आहे.

                    जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे जिल्हाउपाध्यक्ष -शेख सलीम हाजि शेख खालिल (बोदवड )मुल्लाजी इमरान तडवी ( सावदा )अशोक राजाराम बाविस्कर ( चोपडा )राहुल चंद्रकात इंगळे ( जामनेर )महासचिव – अॅड. योगेश्वर तायडे ( सावदा ), सचिव – विश्वनाथ मोरे ( मुक्ताईनगर ), रफीक बेग ( खिर्डी ), संघटक – ईश्वर मोहन लहासे ( वाघोदा ), प्रविण सुपडु भालेराव ( चिनावल ), शहारुख अल्लाउद्दीन तडवी ( यावल ), बबन मुरलीधर कांबळे ( भुसावळ ), सोशल मिडीया व प्रसिद्धी प्रमुख – संगीत भालेराव ( हिंगोणा ) या प्रणाने जाहिर करण्यात आली असुन नुतन कार्यकारणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.