ग्रेट मराठी न्युज,GM NEWS,दबंग कारवाई वृत्त: जामनेर तालुक्यातील तोंडापूरला अवैध गौण खनिज खदाणीवर तलाठी यांच्याकडून कार्यवाही. जामनेर मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांच्या तक्रारीची घेतली दखल. अवैध गौण खनिजांची बेकायदेशीर वाहतुक करणाऱ्यांचे धाबे दणाणले.

0
952

तोंडापूर ता.जामनेर दि,१५ ( सतिष बिराडे ) : –

 जामनेर तालुक्यात अवैध गौण खनिज रेति मुरुम माती व वृक्षाची तोंड यांना मज्जाव करण्यात यावी अशी तक्रार मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटिल यांनी जिल्हाधिकारी जळगाव याच्याकडे करण्यात आली होती तरी हि तोंडापूर येथील बऱ्याच दिवसापासून अवैध गौन खनिज वाहतूक होत असल्याने व दि ८ रोजी अवैध गौन खनिज वाहतूक सुरू असल्याची माहिती स्थानिक गावकऱ्यांच्या वतीने तहसीलदार जामनेर यांना मिळाल्याने मडळ अधिकारी तिर्थनकर व तलाठी शिवाजी काळे यांना पाठवून अवैध गौण खनिज खदाणीवर जावून पंचनामा करण्यात आला पुढील कार्यवाही जामनेर तहसीलदार याच्या कडे सोपवण्यात आल्याने अवैध वाहतूक करनाऱ्या वाहन धारका मध्ये घबराट निर्माण झाली आहे 

तोंडापूर येथे मोठ्या प्रमाणात बाधकाम व पुलाच्या कामासाठी बऱ्याच दिवसापासून अवैध गौण खनिज वाहतूक सर्रासपणे सुरू होती मात्र शासकीय कामाच्या नावाखाली अधिकारी कार्यवाही करण्यास टाळाटाळ होत असल्याने व तालुक्यातील होणाऱ्या अवैध गौण खनिज चि तक्रार मनसे जामनेर तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी केल्यामुळे तोंडापूर येथील शेतकरी याच्या शेतातील पोट खराब श्रेत्रातिल मुरूम वाहतूक होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी तहसीलदार यांना कळविण्यात आल्याने तहसिलदार याच्या आदेशानुसार होणाऱ्या अवैध गौण खनिजाचा शेतात जावून मडळ अधिकारी व तलाठी .पोलीस पाटील याच्या कडून पंचनामा करण्यात आला ६० ब्रास च्या जवळपास मुरूम जे सि बि च्या सहाय्याने खोदून स्थानिक ट्रक्क्टर ने वाहतूक करण्यात आली असल्याचे दिसून आल्याने जागेवर पंचनामा करण्यात आला आहे पंचनामा जामनेर तहसीलदार याच्याकडे जमा करण्यात आला असल्याने काय कार्यवाही होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे झालेल्या कार्यवाही मुळे अवैध वाहतूक करनाऱ्या वाहन धारक मात्र धास्तावले आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून मुरूम खोदकाम करण्यात आले आहे ते श्रेत्र पोट खराब असून ते चालू करण्यासाठी सपाटी करन करत असल्याचे शेतकरी याच्या कडून जबाबात लिहून देण्यात आले आहे तोंडापूर जळगाव जिल्हा व औरंगाबाद जिल्हा सीमेवर असल्याने मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज रेति चि वाहतूक होत असते औरंगाबाद हद्दीतून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक होत असून हद्दि च्या नावाखाली मात्र अधिकारी कार्यवाही करण्यास टाळाटाळ करत असतात कि आपले हित संबंध जोपासत असावे अशी शंका निर्माण होत आहे.