ग्रेट मराठी न्युज,GM NEWS,गुन्हे वार्ता: जामनेर तालुक्यातील सामरोद येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता. जामनेर पोलीस स्टेशला अपहरणाचा गुन्हा दाखल.

0
864

जामनेर दि . 23 ( मिलींद लोखंडे ) : – सामरोद गावातील सचिन मारोती पेठे ( वय -१४ ) हा अल्पवयीन मुलगा दि.११ वार शुक्रवार रोजी सामरोद शिवारात नेहमी प्रमाणे आपल्या गायला चारायला घेऊन गेला असता तो बेपत्ता झाल्याने परीसरात खळबळ उडाली आहे . 

याबाबत सविस्तर वृत्त असे की सचिन पेठे हा अल्पवयीन मुलगा स्वतःची गाय चारण्यासाठी सामरोद / आमयखेडा /तळेगाव शिवारात जात असे तो नेहमी प्रमाणे दि .११ वार शुक्रवारी रोजी गाय चारायला जंगलात गेला परंतु तो सायंकाळी ६ वाजे पर्यंत घरी परतला नाही त्यामुळे त्याच्या घरच्यांनी सचिनची शोधा शोध सुरू केली .रात्री ९ वाजे पर्यंत सामरोद / आमखेडे / तळेगाव शिवारात सचिनचा शोध सुरु होता मात्र अंधार झाल्यामुळे आणी या परीसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याने कुंटुंबीय आणी गावकरी घरी परतले.सकाळ झाल्यावर ५ वा. सचिन चारायला घेऊन गेलेली त्याची गाय गावाजवळ आढळून आली मात्र सचिन आढळून आला नाही त्यामुळे पुन्हा त्याची शोधा शोध सुरु झाली. खुप शोध घेऊनही सचिन सापडला नाही . नातेवाईकांकडे फोन करून विचारपुस केली असता त्याचा तपास लागला नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी दि.१२ नोव्हे शनिवार रोजी सचिनच्या कुटुंबीयांनी जामनेर पोलीस स्टेशनला तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.जामनेर पोलीस स्टेशनला या प्रकरणी भा.द.वि. कलम ३६३ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सचिन बेपत्ता झालेला परीसर हा जंगलाचा भाग असल्याने आणी या परीसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याने जामनेर पो. स्टेचे पो.नि. किरण शिंदे यांनी या घटने विषयी वनभिभागाला सुद्धा भ्रमणध्वनीवरुन कळविले असुन तसे रितसर पत्र सुद्धा उद्या दिले जाणार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ . सचिन पाटील करत आहेत.