ग्रेट मराठी न्यूज,GM NEWS,अभिनंदनीय वृत्त : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार . स्वाभिमानी ज्येष्ठ नागरिक संघाचा स्तुत्य उपक्रम .

0
605

जामनेर दि . १३ ( मिलींद लोखंडे ) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम संलग्न स्वाभिमानी ज्येष्ठ नागरिक संघ जामनेर तालुका जामनेर या संघातील 75 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ग्राम विकास मंत्री व पंचायत राज वैद्यकीय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना . गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . श्री प्रभाकर दत्तात्रय, विसपुते , प्रेम शंकर महावीर त्रिवेदी , रामदास विठोबा कोळी, किसन आनंदा मानकर, कडू कोळी ,बाबुलाल नामदेव तेले ,गणेश काशिनाथ तेले ,तापीराम तनु पाटील , बाबुराव तोताराम पाटील ,नांद्रा यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना गिरीष भाऊ महाजन यांच्या हस्ते सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले . यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी .डी . पाटील यांच्यासह जेष्ठ नागरिक उपस्थित होते .