GM NEWS , ग्रेट मराठी न्यूज ,गुन्हे वार्ता : जामनेर तालुक्यातील पहूर येथे विनापरवाना गाईंची वाहतूक. पहुर पोलीसांनी १३ गाईंची सुटका करून केली गोशाळेत रवानगी.

0
605

संग्रहीत छायाचित्र.


पहूर , ता . जामनेर ( शंकर भामेरे ) : – राजस्थानातून विनापरवाना औरंगाबादकडे ट्रकद्वारे नेल्या जाणाऱ्या १३ गाईंची पहूर पोलिसांनी सुटका करून त्यांची गोशाळेत रवानगी केली आहे .

आज रविवारी ( ता . १३ )सकाळी आठ वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाकोद रस्त्यावर एस. एस .पी .पेट्रोल पंप जवळ जळगांव -औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रक क्रमांक आर .जे . ६ जी .सी . ३३९९ द्वारे ११ गाई व २ वासरे अशी १३ गोवंशाची विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे आढळून आल्याने जमील मोहम्मद इब्राहिम मोहम्मद आणि बबलू मोहम्मद गणी रा . कनिया , ता . गांगेडा ,जि. भीलवाडा ,राजस्थान यांच्या विरुद्ध पो . कॉ . जीवन बंजारा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला . पोलीसांनी ट्रक ताब्यात घेऊन गाईंची सुटका केली व त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात आली .