ग्रेट मराठी न्यूज , GM NEWS,प्रेरणादाई वृत्त : जामनेर तालुक्यातील पहुर येथील लेकीचं सवाद्य मिरवणुकीने स्वागत . अडीच महिने देत होती मृत्यूची झुंज . ‘देव तारी त्याला कोण मारी ‘ या ऊक्तीचा आला प्रत्यय .

0
3374

पहूर , ता . जामनेर दि . १ ( शंकर भामेरे ) : – 

‘देव तारी त्याला कोण मारी ? ‘या उक्तीप्रमाणेच मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पहुर पेठ येथील लेकीचं गावकऱ्यांनी सवाद्य मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं .

          पहूर पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते कडूबा ठमाजी पाटील यांची नात , ग्रामपंचायत सदस्य मीनाताई शरद पाटील यांची २२ वर्षीय विवाहित मुलगी व पोलीस दलात कार्यरत असलेले योगेश थोरात यांची पत्नी अश्विनी योगेश पाटील ( रा .पिंपळगांव बुद्रूक ) यांना गर्भवती असताना डबल न्यूमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली . नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांना वाचविण्याची शर्तीचे प्रयत्न झालेत . वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांच्या गर्भात ७ महिन्यांचे २ भ्रृण मृत्युमुखी पडल्याचे निष्पन्न झाल्याने डॉक्टरांच्या पायाखालची वाळूच सरकली . परंतु दैव बलवत्तर म्हणून की काय ? डॉ शरद देशमुख यांच्यासह सर्व डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले . दवा आणि दुवा कामी आली .अडीच ते तीन महिने मृत्यूशी झुंज देत आजारातून बरे होऊन आज त्यांचे माहेरी पहुर पेठ नगरीत आगमन झाले . मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या लेकीचे स्वागत करण्यासाठी गावकरी ढोल ताशांचा गजर करत आतुरतेने वाट पाहत होते . यावेळी उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समितीचे प्रमुख रामेश्वर पाटील , आर . टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर .बी .पाटील यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .