जामनेर दि . ७ ( मिलींद लोखंडे) : –
जामनेर तेली समाज मंडळाची नवीन कार्यकारणी निवडीची बैठक नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली .
सदर बैठक जामनेर येथील हिवरखेडा रोड परिसरातील नाट्यगृहामध्ये समाजाचे अध्यक्ष किशोर उत्तम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आयोजित करण्यात आली होती . या बैठकित तेली समाजाचे मावळते अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी राजीनामा दिल्याने नवीन कार्यकारणी निवड जाहीर करण्यात आली.
कार्यकारणी खालील प्रमाणे अध्यक्षपदी सोपान लक्ष्मण चौधरी ,उपाध्यक्षपदी निखिल दुर्गादास बोलाणे ,सचिव ईश्वर संतोष चौधरी, सहसचिव रामेश्वर पाटील, खजिनदार मोहन चौधरी ,सदस्य म्हणून तुषार चौधरी ,सत्यजित चौधरी ,किशोर चौधरी, सुरेश चौधरी, अनिल चौधरी ,पप्पू चौधरी ,तेजस चौधरी ,अजय चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी ,दत्तात्रय चौधरी यांची नवीन कार्यकारणीमध्ये निवड झाली .
नवीन कार्यकारणीचे समाजातील जेष्ठ नागरिकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .नवीन कार्यकारणीचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
सामाजिक उन्नतीसाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असून वेळोवेळी सहकार्य करण्याचे आवाहन नवनियुक्त अध्यक्ष सोपान चौधरी यांनी केले .