ग्रेट मराठी न्युज,GM NEWS, शैक्षणीक सहल वृत्त: जामनेर शहरातील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक सहल शिर्डी येथे आनंदात संपन्न !

0
332

जामनेर,दि.११ ( मिलींद लोखंडे ) :-
जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयाची शिर्डी येथे शैक्षणिक सहल आनंदात संपन्न झाली.
प्रारंभास दि.९ रोजी रात्री ठीक १० वा. श्रीफळ वाढवून बस पूजन तथा वाहक यांना तिलक पूजन मा.उपप्राचार्य प्रा.के एन मराठे, पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे यांच्या शुभहस्ते झाले.
दि.१० रोजी शिर्डी येथे पोचल्यानंतर साईबाबांचे दर्शन घेतले, त्यानंतर भव्य साई तीर्थ थीम या ठिकाणी 5डी शो लंका दहन, भारतातले १० प्रसिद्ध मंदिर तीर्थयात्रा , द्वारकामाई, सबका मालिक एक नाट्य, भव्य स्क्रीन वर साईबाबा यांच्या जीवनावरील चित्रपट, रोबोटिक्स शो साईबाबा,आदी. पाहून विद्यार्थ्यांनी श्री साईबाबांचा जीवनाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी समजून घेतला, त्यानंतर वेट ऍण्ड जॉय वॉटर पार्क येथे २२ प्रकारचे राईडस् , रेन डान्स, लेझी रिवर, वेव्ह पूल आदी. वॉटर पार्क मध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी आनंद लुटला.
त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता साईबाबांच्या प्रसादालय (जेवण) विद्यार्थ्यांनी घेतले व त्यानंतर ऐतिहासिक “शिवसृष्टी प्रदर्शन” यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विविध प्रकारचे शस्त्र साहित्य प्रदर्शन भरविण्यात आले होते त्या ठिकाणी शिवकालीन अभ्यास विद्यार्थ्यांनी समजून घेतला.
रात्री अकरा वाजता बस मध्ये बसून परतीचा प्रवास करून आज दि.११ रोजी पहाटे ४ वा. जामनेर येथे सर्व विद्यार्थी व शिक्षक सुखरूप पोहोचले.
या शैक्षणिक सहल मध्ये इ.११ व,१२ कला/विज्ञान शाखेचे एकूण ८३ विद्यार्थ्यांनी (फक्त मुले) यांनी सहभाग घेतला आहे.
सहलीसाठी मुख्याध्यापक प्रा.जे.पी. पाटील,शैक्षणिक सहल समिती प्रमुख प्रा.विजय पाटील,प्रा.डी.झेड.गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
सहल यशस्वीतेसाठी प्रा.दिनेश महाजन, प्रा.संदीप राजपूत, प्रा.सुमित काबरे, प्रा.सचिन बावस्कर, प्रा.शुभम शंखपाळ, प्रा.रवींद्र शेले, प्रा.योगेश पोळ, क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांनी परिश्रम घेतले.