ग्रेट मराठी न्युज,GM NEWS,जनजागृती वृत्त : जिल्हास्तरीय लोकशाही दिन 6 फेब्रुवारी रोजी .

0
77

जळगाव, दि. 2 ( मिलींद लोखंडे) :- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन 6 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.

  तरी जिल्ह्यातील नागरीकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आंत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.